ओबीसी महामाेर्चाला वाढता पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:32 AM2021-02-08T04:32:06+5:302021-02-08T04:32:06+5:30
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडीने ओबीसींच्या महामाेर्चाला पाठिंबा दर्शविला आहे. गडचिराेली जिल्ह्यात ५० टक्केच्या ...
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडीने ओबीसींच्या महामाेर्चाला पाठिंबा दर्शविला आहे. गडचिराेली जिल्ह्यात ५० टक्केच्या वर गैर आदिवासी असतानाही ओबीसींचे आरक्षण कमी आहे. हे आरक्षण पूर्ववत करावे व बहुसंख्य गैर आदिवासी असलेली गावे पेसातून वगळावी, अशी मागणी प्रांतिक महासभा युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहूल भांडेकर, वैभव जुवारे, विकेश नैताम, रमेश काेठारे, दुश्यंत कुनघाडकर, हरिष नैताम, पंकज खाेबे, पद्माकर भुरसे, हर्षद भांडेकर, नयन कुनघाडकर यांनी केली आहे.
माेर्चात माेठ्या संख्येने सहभागी व्हा : प्रमाेद पिपरे
२२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या महामाेर्चात जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी माेठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप जिल्हा महामंत्री, नगरसेवक तथा प्रांतिक तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रमाेद पिपरे यांनी केले आहे. ओबीसींचे आरक्षण कमी असल्याने समाजात सुशिक्षित बेराेजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच पेसा कायदा गैर आदिवासींसाठी अन्यायकारक ठरत आहे, असेही प्रमाेद पिपरे यांनी म्हटले आहे.
आदिवासी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद
विविध मागण्यांसाठी ओबीसी समाजाच्या वतीने २२ फेब्रुवारीला महामाेर्चा काढला जाणार आहे. या माेर्चाला आदिवासी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने पाठिंबा दर्शविला आहे. सामाजिक जनजागृती, एकीकरण व सामाजिक सहभाग ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. समाजातील सर्वांनी आपला वाटा उचलून कृतिशील व्हावे, असे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कुसूम अलाम यांनी म्हटले आहे.
ओबीसी महामाेर्चाला पाठिंबा : आशिष कन्नमवार
जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी २२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर महामाेर्चा काढला जाणार आहे. या महामाेर्चाला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष कन्नमवार यांनी पाठिंबा दर्शविला आहे. या महामाेर्चात ओबीसी बांधवांनी माेठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सुद्धा आशिष कन्नमवार यांनी केले आहे.