शेतकऱ्यांना उत्पादनवाढीचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:34 AM2018-07-16T00:34:58+5:302018-07-16T00:35:54+5:30

कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, आत्मा व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी कल्याण अभियानांतर्गत आंबेशिवणी येथील शेतकऱ्यांना उत्पादन वाढीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

Growth Advisory for the farmers | शेतकऱ्यांना उत्पादनवाढीचा सल्ला

शेतकऱ्यांना उत्पादनवाढीचा सल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देआंबेशिवणी येथे कार्यक्रम : कृषी कल्याण अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, आत्मा व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी कल्याण अभियानांतर्गत आंबेशिवणी येथील शेतकऱ्यांना उत्पादन वाढीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच माणिक झंझाळ होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, उपविभागीय कृषी अधिकारी हिरळकर, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. कऱ्हाळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. इंदूरकर आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. प्रकाश पवार यांनी सेंद्रीय शेतीचे महत्त्व पटवून दिले. शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी व जमिनीची कस टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रीय पध्दतीने शेती करावी, असे मार्गदर्शन केले. डॉ. कऱ्हाळे यांनी यांत्रिकीकरण व कीटकनाशकांची फवारणी करताना घ्यावयाची काळजी, याबाबत मार्गदर्शन केले. संचालन कृषी पर्यवेक्षक एम. जे. दिहारे तर आभार आलेवार यांनी मानले. यावेळी जिरीतकर, चलकलवार यांनी सहकार्य केले.

Web Title: Growth Advisory for the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.