पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी नक्षलग्रस्त भागातील पोलीस भगिनी, स्थानिकांसोबत साजरं केलं रक्षाबंधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 01:32 PM2021-08-22T13:32:21+5:302021-08-22T13:32:57+5:30

एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील पोलीस आउटपोस्टला पालकमंत्र्यांनी दिली भेट

Guardian Minister Eknath Shinde celebrates Rakshabandhan with police sisters and locals in Naxal affected areas | पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी नक्षलग्रस्त भागातील पोलीस भगिनी, स्थानिकांसोबत साजरं केलं रक्षाबंधन

पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी नक्षलग्रस्त भागातील पोलीस भगिनी, स्थानिकांसोबत साजरं केलं रक्षाबंधन

Next

गडचिरोली : राज्याचे नगर विकासमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नक्षली कारवायांचे केंद्र असलेल्या अतिसंवेदनशील एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील पोलीस आउटपोस्टला शनिवारी भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस, पोलीस कुटूंबातील महिला आणि स्थानिक आदिवासी महिलांकडून राखी बांधून घेत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. याप्रसंगी उपस्थित सर्व महिला भगिनींना त्यांनी शुभेच्छा दिल्या. 

यासमयी नक्षली कारवायांचा धोका पत्करून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधव आणि भगिनींना ते करत असलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले, तसेच त्यांना कर्तव्य बजावताना येणाऱ्या सर्व समस्या सोडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी  दिले. 

यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल आणि सर्व पोलीस बांधव त्यांचे कुटूंबीय आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

 

Web Title: Guardian Minister Eknath Shinde celebrates Rakshabandhan with police sisters and locals in Naxal affected areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.