खमनचेरू शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागताला पालकमंत्री पोहोचले
By admin | Published: June 29, 2016 01:31 AM2016-06-29T01:31:45+5:302016-06-29T01:31:45+5:30
शासकीय आश्रमशाळा खमनचेरू येथे सोमवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा.
पालकही उपस्थित : विद्यार्थ्यांचा उत्साह दुणावला
अहेरी : शासकीय आश्रमशाळा खमनचेरू येथे सोमवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम पोहोचले. मंत्रिमहोदय उपस्थित झाल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह दुणावला. यावेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री आत्राम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी अहेरीचे प्रकल्प अधिकारी राममूर्ती, सहायक प्रकल्प अधिकारी लाटकर, भाजप व नाविसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाळेत आलेल्या विद्यार्थिनीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच काही विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)