पालकमंत्री, सचिवांची लोकबिरादरीला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 01:15 AM2019-02-02T01:15:20+5:302019-02-02T01:16:53+5:30

पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, केंद्र सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर यांनी शुक्रवारी भामरागड नजीकच्या हेमलकसा येथे जाऊन तेथील लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी लोकबिरादरी प्रकल्पाची माहिती जाणून घेतली.

Guardian Minister, Secretariat Visit to Lokbiradari | पालकमंत्री, सचिवांची लोकबिरादरीला भेट

पालकमंत्री, सचिवांची लोकबिरादरीला भेट

googlenewsNext
ठळक मुद्देप्रकल्पाची माहिती जाणून घेतली : आमटे कुटुंबीयांशी विविध विषयांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, केंद्र सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर यांनी शुक्रवारी भामरागड नजीकच्या हेमलकसा येथे जाऊन तेथील लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी लोकबिरादरी प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. त्यांनी आमटे कुटुंबीयांशी विविध उपक्रमांबाबत चर्चा केली.
याप्रसंगी त्यांच्या समवेत आदिवासी विकास, आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनिषा वर्मा, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, हेमलकसाचे संचालक डॉ.प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, लोकबिरादरी दवाखान्याचे प्रमुख डॉ. दिगंत आमटे, प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, आश्रमशाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे, भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील, उपविभागीय पोलीस अधीक्षक तानाजी बरडे, भामरागड प्रकल्प अधिकारी निरज मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी केंद्रीय सचिव खांडेकर यांनी डॉ.आमटे दाम्पत्याशी विविध विषयांवर चर्चा केली. शुक्रवारी भामरागड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारत लोकार्पण सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून केंद्रीय सचिव दीपक खांडेकर भामरागडात आले होते. दरम्यान त्यांनी लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.
डॉ. दिगंत आमटे, अनिकेत आमटे, समिक्षा आमटे यांनी लोकबिरादरीतील प्राणी अनाथालय, संगणक कक्ष, आश्रमशाळा, ग्रंथालय, गोटूल, बांबू हस्तकला व दवाखाना आदीबाबतची माहिती खांडेकर यांना दिली. यावेळी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांसह सर्व अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
 

Web Title: Guardian Minister, Secretariat Visit to Lokbiradari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.