कोटपा कायद्याविषयी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:28 AM2018-01-14T00:28:12+5:302018-01-14T00:28:58+5:30
जिल्हा विधीसेवा प्राधिकरण व पोलीस मुख्यालय गडचिरोली यांच्या वतीने पोलीस मुख्यालयातील सभागृहात शुक्रवारी कोटपा अॅक्ट व अंमली पदार्थ विरोधी कायदे या विषयावर कायदेविषयक शिक्षण शिबिर घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा विधीसेवा प्राधिकरण व पोलीस मुख्यालय गडचिरोली यांच्या वतीने पोलीस मुख्यालयातील सभागृहात शुक्रवारी कोटपा अॅक्ट व अंमली पदार्थ विरोधी कायदे या विषयावर कायदेविषयक शिक्षण शिबिर घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. एम. रेड्डी होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्य न्यायदंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) बी. एम. पाटील, प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा सामान्य रूग्णालयाचे डॉ. नंदू मेश्राम उपस्थित होते. मुख्य न्याय दंडाधिकारी तथा जिल्हा विधीसेवा समितीचे सचिव बी. एम. पाटील यांनी कोटपा कायदा, जुव्हेनाईल जस्टीस केअर अँड प्रोटेक्ट अॅक्ट, अन्न सुरक्षा कायदा व अंमली पदार्थ विरोधी कायदे यावर मार्गदर्शन केले. डॉ. नंदू मेश्राम यांनी अंमली पदार्थांमुळे होणारे दुष्परिणाम, उपाययोजना, कर्करोगाची माहिती दिली. तसेच तपासणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रशांत दिवटे यांनी केले. यशस्वीतेसाठी पोलीस मुख्यालयातील कर्मचाºयांनी सहकार्य केले.