भूजलाचा साठा वाढीबाबत नागरिकांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:41 AM2021-07-14T04:41:40+5:302021-07-14T04:41:40+5:30
जिल्हा व तालुकास्तरावरील शासकीय यंत्रणेचे अधिकारी, रो. ह. यो. कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, राष्ट्रीय सेवा ...
जिल्हा व तालुकास्तरावरील शासकीय यंत्रणेचे अधिकारी, रो. ह. यो. कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, ग्रामपंचायत स्तरावरील जलसुरक्षक, ग्रामसेवक, ग्रामस्थ यांच्या ऑनलाइन अंतर्गत कार्यशाळा घेण्यात आल्या. कार्यशाळेत जिल्ह्यातील भौगोलिक व भूशास्त्रीय रचना, छतावरील पाऊस पाणी संकलन, पाण्याचा ताळेबंद, विहीर पुनर्भरण व लोकसहभागाचे महत्व विषद करण्यात आले. माहे मे-जून २०२१ पासून आजतागायत साधारण १५ कार्यशाळा संपन्न झाल्या. सदरील कार्यशाळेत १०३१ नागरिकांनी सहभाग घेतला.
सदर कार्यशाळेत जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक तुकेश सयाम, सहायक भूवैज्ञानिक प्रशांत गोलांगे, कनिष्ठ भूवैज्ञानिक तुषार पखाले, कनिष्ठ भूवैज्ञानिक वैभव श्रीरामे, पदव्युत्तर भूशास्त्र विभाग डॉ. मुरकुटे, मनोहर हेपट, एनएसएसचे जिल्हा समन्वयक डॉ. खंदारे, डॉ. श्रीमती पळसपगारे, डॉ. योगेश पाटील, प्राचार्य डाॅ. राजाभाऊ मुनघाटे, डॉ. गुणवंत वडपल्लीवार, डॉ. हरीष लांजेवार, जे. डॉ. डोर्लीकर आदींनी मार्गदर्शन केले. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांचे दिनी वृक्षारोपण, जल बचाव, जल हे जीवन आहे व जलचक्र या विषयांवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.