शेतकऱ्यांना शेतीबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:27 AM2021-06-06T04:27:35+5:302021-06-06T04:27:35+5:30
पहिल्या दिवशी आकापूर चक, शिवनी खुर्द, कोजबी, वासाळा, शिरशी, देलोडा खुर्द, दवंडी, पिसेवडधा, देलोडा बुद्रुक या गावांमध्ये कृषी सप्ताह ...
पहिल्या दिवशी आकापूर चक, शिवनी खुर्द, कोजबी, वासाळा, शिरशी, देलोडा खुर्द, दवंडी, पिसेवडधा, देलोडा बुद्रुक या गावांमध्ये कृषी सप्ताह मोहिमेला उत्साहात सुरुवात करण्यात आली. कृषी सहायक व कृषी विभागाचे कर्मचारी, अधिकारी यांच्यामार्फत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जात आहे. विशेषतः आकापूर चक येथे कृषी सप्ताहानिमित्ताने ‘फळबाग लागवड’ या विषयावर मंडळ कृषी अधिकारी जी. एन. जाधवर यांनी, ‘बीजप्रक्रिया व बियाणांची उगवण क्षमता तपासणे’ या विषयावर कृषी पर्यवेक्षक ए. आर. हुकरे यांनी, ‘विकेल ते पिकेल, मार्केटिंग, निर्यात, काढणी पश्चात तंत्रज्ञान व सेंद्रिय शेती’ या विषयावर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. डी. रहांगडाले यांनी, ‘एक गाव एक वाण’ या विषयावर कृषी उपसंचालक गडचिरोली वसवाडे यांनी, ‘खत व्यवस्थापन’ या विषयावर, तंत्र अधिकारी बादाडे यांनी, ‘शेतीशाळा’ या विषयावर कृषी सहायक वाय. एच. सहारे यांनी तर ‘भात लागवड तंत्रज्ञान व पीक संरक्षण’ या विषयावर तालुका कृषी अधिकारी टी. डी. ढगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन कृषी सहायक डी. के. क्षीरसागर यांनी केले.
===Photopath===
020621\203422094950img-20210602-wa0083.jpg
===Caption===
आरमोरी तालुक्यात कृषी सप्ताहाला उत्साहात सुरुवात