वनऔषधी संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2017 01:37 AM2017-05-04T01:37:09+5:302017-05-04T01:37:09+5:30

भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत यांच्या वतीने चातगाव येथे महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूलमध्ये दोन

Guidance for farmers in terms of herbicide | वनऔषधी संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

वनऔषधी संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Next

दोन दिवसीय शिबिर : भारतीय किसान संघ विदर्भ प्रांततर्फे आयोजन
धानोरा : भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत यांच्या वतीने चातगाव येथे महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूलमध्ये दोन दिवसीय कार्यकर्ता अभ्यासवर्ग घेण्यात आला. यादरम्यान शेतकऱ्यांना औषधी वनस्पतीच्या लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
अभ्यास वर्गाचे उद्घाटन विदर्भ प्रांत अध्यक्ष नाना आकरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ प्रांत संघटन मंत्री रमेश मंडाळे, विदर्भ प्रांत महामंत्री उदय बोरावार, भारतीय किसान संघाचे जिल्हा मंत्री राजेश वानी, युवा प्रमुख विकास सारवे, उपाध्यक्ष देवगडे, डॉ. दिलीप बर्वे, कार्यालय मंत्री विलास भृगुवार, आनंदराव उसेंडी, प्रकाश तुम्पल्लीवार, जगदीश कोत्तावार, विजय कोतपल्लीवार, रमेश उप्पलवार, डॉ. कोवे, किरण बर्वे, आशा मंगाम, वर्षा उईके, सरिता गावडे, सुशिला उसेंडी, कृष्णा कोवे उपस्थित होते.
अभ्यास वर्गादरम्यान गडचिरोली जिल्ह्यात शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. खरपुंडी येथील कुकुडकार यांनी उत्कृष्ट शेळी पालन करून शेतीला जोडधंदा उपलब्ध करून दिला आहे. रानखेडा या गावचे मंगेश भुबडे व बेलगावचे गुरूदास कोठारे यांनी भाजीपाला क्षेत्रात विक्रमी उत्पादन घेऊन सभोवतालच्या शेतकऱ्यांसमोर एक आदर्श प्रस्तापित केला. ठिबक सिंचनाचा वापर करून कमी पाण्यात देखील सुंदर शेती करता येते, हे आपल्या प्रयत्नांनी दाखवून दिले.
तामशेट्टीवार यांनी कोरडवाहू शेतीत १५ क्विंटल प्रति एकर कापसाचे उत्पन्न घेऊन कापसाची शेती कशी फायदेशिर आहे, हे दाखवून दिले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी परिसरातील शेतकऱ्यांना विविध पिकांच्या लागवडीचे तंत्र समजावून सांगितले. संघटनेचा विस्तार करून उपयुक्त माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Guidance for farmers in terms of herbicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.