स्वस्त धान दुकानदारांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:28 AM2020-12-25T04:28:51+5:302020-12-25T04:28:51+5:30

आढावा सभेत डिसेंबर महिन्याचे नियमित धान्य वितरण, पीएनजीकेएवाय अंतर्गत धान्य वितरण, पाॅश मशीनवर ट्राजेक्शन, ऑनलाईन आरसी काढणे याबाबत रेशन ...

Guide to cheap grain shoppers | स्वस्त धान दुकानदारांना मार्गदर्शन

स्वस्त धान दुकानदारांना मार्गदर्शन

googlenewsNext

आढावा सभेत डिसेंबर महिन्याचे नियमित धान्य वितरण, पीएनजीकेएवाय अंतर्गत धान्य वितरण, पाॅश मशीनवर ट्राजेक्शन, ऑनलाईन आरसी काढणे याबाबत रेशन दुकानदारांना मार्गदर्शन करण्यात आले. शासन निर्णयातील तरतुदीनुसार १५ ते २० तारखेच्या आत सर्व दुकानदारांनी पासिंग करावे. विक्री रजिस्टर, साठापंजी हे दस्तावेज अद्यावत ठेवावे, असे निर्देश तहसीलदारांनी दिले. माझे कुटुंब, माझी जबाबदारी माेहीम सुरू झाली आहे. काेराेनाचा प्रसार राेखण्यासाठी सर्व दुकानदारांना बॅनरचे वितरण करण्यात आले. सभेला १२६ स्वस्त धान्य दुकानदार व ८० अर्धघाऊक केराेसीन विक्रेते हजर हाेते.

धानाेरा तालुक्यातील दुर्गम भागात विजेची समस्या गंभीर असल्याने केराेसीनचा काेटा वाढविण्यात यावा, अशी मागणी केराेसीन दुकानदारांनी केली असता, तसे प्रस्ताव ग्रामपंचायतीच्या ठरावानिशी पाठवावे, असे निर्देश तहसीलदारांनी दिले. सभेला नायब तहसीलदार डी.आर.भगत, प्रभारी पुरवठा निरीक्षक सी.एस.प्रधान, किरण मेश्राम, मनाेज आकनुवार, साेनी लेनगुरे आदी उपस्थित हाेते.

Web Title: Guide to cheap grain shoppers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.