बांधावर जाऊन शेतकऱ्यांना पिकांबाबत मार्गदर्शन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 11:41 PM2019-05-31T23:41:20+5:302019-05-31T23:41:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा मनोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा मनोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभागातील कर्मचाºयांनी शेतकºयांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, असे निर्देश पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले.
२०१९-२० च्या खरीप हंगामाच्या नियोजनाची माहिती जाणून घेण्यासाठी शुक्रवारी आढावा सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. आढावा बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, अपर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, आत्माचे प्रकल्प संचालक प्रकाश पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, लिड बँकेचे व्यवस्थापक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी कृषी खात्याने अधिक प्रयत्न करावेत. प्रत्येक शेतकºयांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचेल, या दृष्टीने प्रयत्न करावेत. कलापथक, पत्रके, माध्यमे आदींच्या माध्यमातून जनजागृती करावी, असे आवाहन पालकमंत्री यांनी केले. जिल्ह्यात यावर्षी हंगामात २ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावर धानाच्या लागवडीचे नियोजन केले आहे. सोयाबिनच्या तुलनेत शेतकरी कापूस पिकाला पसंती दर्शवित असल्याने याही वर्षी कापसाचे लागवड क्षेत्र वाढणार आहे.
अपघात विम्याची २७ प्रकरणे प्रलंबित
राज्य शासन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा राबवित आहे. या योजनेंतर्गत शेतकºयाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला दोन लाख रुपयांचा विमा दिला जातो. २०१५-१६ या वर्षापासून शासनाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत मागील वर्षात १५१ प्रस्ताव प्राप्त झाले. हे सर्व प्रस्ताव विमा कंपनीकडे सादर करण्यात आले. कंपनीने ५८ प्रस्ताव मंजूर करून त्यांच्या वारसांना विमा रक्कम दिली. ३३ प्रस्ताव नामंजूर केले तर २७ प्रस्ताव प्रलंबित ठेवले आहेत, अशी माहिती कृषी अधिकाºयांनी दिली.