विषय सहायकांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2017 01:47 AM2017-06-10T01:47:05+5:302017-06-10T01:47:05+5:30
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेत प्राचार्य रवींद्र रमतकर यांच्या अध्यक्षतेखाली ....
विकास संस्थेत सभा : अॅक्शन प्लॅन तयार करण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेत प्राचार्य रवींद्र रमतकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विषय सहायकांची सभा पार पडली.
या सभेला ज्येष्ठ अधिव्याख्याता धनंजय चापले, डॉ. विनित मत्ते, सचिन चव्हाण, डॉ. नरेश वैैद्य उपस्थित होते. जिल्हा निवड समितीमार्फत निवड प्रक्रियेतून प्रतिनियुक्तीने निवड झालेल्या विषय सहायकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण विकास संस्थेची पूनर्रचना, विभागाचे माहिती डॉ. नरेश वैद्य यांनी दिली. धनंजय चापले यांनी पीएसएम मधील पायाभूत मूल्य, आरटीई २००९ मधील तरतुदींविषयी माहिती दिली. सचिन चव्हाण यांनी पायाभूत व संकलित चाचणी, माहिती संकलित करणे, अध्ययन समस्या याबाबत माहिती दिली. विषय साधन गटाचे विषय सहायक यांना आपापल्या विषयासाठी जिल्ह्यातील मूल शिकण्यासाठी प्रवृत्त करणे, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचे सक्षमीकरण करून अॅक्शन प्लॅन तयार करण्याचे निर्देश प्राचार्य रमतकर यांनी दिले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम हा एक उपक्रम नसून योजना आहे. शेवटचे मूल शिकले पाहिजे. शिक्षकच नाही तर यंत्रणेतील सर्व घटकांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याला त्या वर्गातील प्रत्येक क्षमता १०० टक्के प्राप्त होणे म्हणजेच विद्यार्थी प्रगत होणे होय. याकरिता जिल्हा संसाधन गटाने नियोजन करावे, असे आवाहन प्राचार्य रवींद्र रमतकर यांनी केले. यावेळी विषय साधन गटाचे विषय सहायक डॉ. विजय रामटेके, कुणाल कोवे, संजय बिडवाईकर, प्रदीप पाटील, विठ्ठल होंडे उपस्थित होते.