एका हातात बंदूक तर दुसऱ्या हातात काठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:37 AM2021-05-10T04:37:35+5:302021-05-10T04:37:35+5:30
काेराेना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने शासन, प्रशासनामार्फत विविध उपाययाेजना करीत आहे. तसेच नियमांची अंमलबजावणी स्थानिक स्तरावर केली जात ...
काेराेना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने शासन, प्रशासनामार्फत विविध उपाययाेजना करीत आहे. तसेच नियमांची अंमलबजावणी स्थानिक स्तरावर केली जात आहे. भामरागड शहरात बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी करणे तसेच संचारबंदी नियमाचे पालन व्हावे यासाठी बंदाेबस्त लावून नागरिकांना शहरात अनावश्यक फिरू न देणे यासारखी कामे पाेलीस करीत आहेत. येथील चौकात पोलीस अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावत असतानाच नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करीत आहेत. पहिल्या लाटेत केवळ शहरी भागात काेराेनाचा संसर्ग हाेता. परंतु आता गावखेड्यातही कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. जिल्ह्यात प्रत्येक गावात पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. विनाकारण फिरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी जागोजागी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. रुग्ण वाढत असल्यामुळे एकीकडे नक्षल तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी बंदाेबस्त लावणे अशी दुहेरी भूमिका भामरागडसह नक्षलग्रस्त भागातील पाेलिसांना बजावावी लागत आहे. भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवने, ठाणेदार किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संघमित्र बांबाेळे हे पाेलीस कर्मचाऱ्यांसह भामरागडातील मुख्य चौकावर बाहेरून येणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रखरखत्या उन्हात उभे राहून कसून तपासणी व विचारपूस करीत आहेत.
===Photopath===
090521\09gad_5_09052021_30.jpg
===Caption===
भामरागड येथे वाहनधारकांची तपासणी करताना पाेलीस.