गुरूदेवभक्तांची राष्ट्रसंतांना आदरांजली
By Admin | Published: November 1, 2015 01:51 AM2015-11-01T01:51:48+5:302015-11-01T01:51:48+5:30
अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने शनिवारी पहाटे ५.३० वाजता सामूहिक ध्यानाचा कार्यक्रम गुरूदेव सेवा मंडळाच्या शाखेत पार पडला.
शहरातून काढली रामधून : विविध धर्मांचे प्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित
गडचिरोली : अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने शनिवारी पहाटे ५.३० वाजता सामूहिक ध्यानाचा कार्यक्रम गुरूदेव सेवा मंडळाच्या शाखेत पार पडला. यावेळी सामूदायिक ध्यानावर अड्याळटेकडीचे प्रा. रतनलाल मौर्य महाराज यांनी आपले विचार प्रगट केले. त्यानंतर सकाळी ६.३० वाजता गडचिरोली शहरातून रामधून काढण्यात आली. दुपारी ३ वाजता सर्वधर्म परिषद घेण्यात आली. यात प्रमुख वक्ते म्हणून शीख समाजाचे प्रतिनिधी मंगलसिंग पटवा, मुस्लीम समाजाचे प्रतिनिधी मौलाना रहिम शेख यांच्यासह गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. सायंकाळी ४.५८ वाजता राष्ट्रसंतांना मौन आदरांजली वाहण्यात आली. व सर्व संतांचे पुण्यस्मरण यावेळी गुरूदेव भक्तांनी केली. यावेळी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गुरूदेव सेवा मंडळाचे उपाध्यक्ष अरविंद वासेकर, प्रा. रतनलाल महाराज मौर्य, गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, डॉ. मुरलीधर बद्दलवार, प्रा. करकाडे, विवेक चडगुलवार, नरेंद्र भरडकर, बी. डी. धकाते, महागुजी बारापात्रे येरमे, गेडाम, राऊत, सुरेश मांडवगडे, पुडके, मांडवगडे यांच्यासह गुरूदेव सेवा मंडळाच्या शाळेचे विद्यार्थी, शहरातील नागरिक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पंडित पुडके यांनी केले. गेल्या दोन दिवसांपासून गुरूदेव सेवा मंडळाच्या मुख्य शाखेत कार्यक्रम सुरू आहेत. शहरातही गुरूदेवांना आदरांजली वाहणारे फलक लावण्यात आले आहे. (प्रतिनिधी)