तासिका तत्त्वावरील गुरुजींचा उदरनिर्वाहासाठी आटापिटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:44 AM2021-09-08T04:44:18+5:302021-09-08T04:44:18+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात सहाय्यक प्राध्यापकांची हजाराे पदे रिक्त आहेत. अशास्थितीत तासिक तत्त्वावर अंशकालीन प्राध्यापक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात सहाय्यक प्राध्यापकांची हजाराे पदे रिक्त आहेत. अशास्थितीत तासिक तत्त्वावर अंशकालीन प्राध्यापक म्हणून अनेकजण काम करीत आहेत. मात्र अल्पमानधनामुळे या प्राध्यापकांना विविध कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. तासिका तत्त्वावरील काही प्राध्यापक व शिक्षक शेताच्या कामावरही जात असल्याचे दिसून येत आहे.
गाेंडवाना विद्यापीठांतर्गत दाेन्ही जिल्हे मिळून जवळपास पावणेदाेनशे महाविद्यालये संलग्नित आहेत. यामध्ये निम्मे महाविद्यालये १०० टक्के अनुदानित आहेत, तर काही महाविद्यालये अंशता अनुदानित तर काही महाविद्यालयातील दाेन ते तीन विषय अनुदानित आहेत. विनाअनुदानित विषयावरही मानधनावर अनेक प्राध्यापक महाविद्यालयात अध्यापनाचे कामे करीत आहेत.
बाॅक्स....
सेट-नेट बेराेजगारांची समस्या वेगळीच
पूर्वी मराठी, समाजशास्त्र, इतिहास, गृहअर्थशास्त्र आदी विषयांवर नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड हाेती. मात्र आता विज्ञान व वाणिज्य शाखेतील गणित, विज्ञान विषयात अनेकजण नेट-सेट उत्तीर्ण आहेत.
ही परीक्षा उत्तीर्ण असूनही स्थायी नाेकरी नसल्याने हे उमेदवार हवालदिल झाले आहेत.
बाॅक्स ......
मुलाखती देऊन अनेकजण थकले
पदव्युत्तर पदवी त्यानंतर सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अध्यापनाचा अनुभव असलेले जिल्ह्यातील अनेक अंशकालीन प्राध्यापक स्थायी नाेकरीसाठी मुलाखती देऊन थकले आहेत. मात्र संस्था व समितीकडून निवड न झाल्याने नैराश्य आले आहे.
बाॅक्स .....
कनिष्ठ महाविद्यालयातही अनेकजण कार्यरत
-गडचिराेली जिल्ह्यात बऱ्याच अनुदानित महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मात्र सरकारकडून भरतीस परवानगी नाही. तसेच राेस्टर अद्यावत नसल्याने पदभरतीत अडचणी येत आहेत.
-कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान, वाणिज्य व कला शाखेला अनेकजण तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. याशिवाय शासकीय आश्रमशाळेमध्ये मानधन शिक्षक कार्यरत आहेत.
काेट......
गेल्या अनेक वर्षांपासून आपण दाेन ते तीन महाविद्यालयात अंशकालीन प्राध्यापक म्हणून काम करत आहे. येथे मानधन कमी मिळत असल्याने पत्रकारिता क्षेत्रातही आपण काम करीत आहे. राज्यात प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. मात्र भरतीप्रक्रिया थंडबस्त्यात आहे.
- संताेष सुरपाम, प्राध्यापक
रिक्त असलेल्या अनुदानित महाविद्यालयात तसेच शासकीय महाविद्यालयात प्राध्यापकांची भरतीप्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने मान्यता द्यावी.
- गुलाब बावनथडे, प्राध्यापक
काेराेना संकटामुळे गेल्या तीन वर्षांपासून नियमित प्राध्यापकांची भरतीप्रक्रिया बंद आहे. सध्या ऑनलाइन स्वरूपात तासिका सुरू आहेत. मानधनात वाढ करण्याची मागणी आहे.
- सुरेखा चाैधरी, प्राध्यापक