देसाईगंज शहरात मोकाट जनावरांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:18 AM2021-09-02T05:18:56+5:302021-09-02T05:18:56+5:30

देसाईगंज शहर हे व्यापारी दृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण आहे. मुख्य राष्ट्रीय महामार्गाने लगतच्या छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यांशी जोडले ...

Hados of Mokat animals in Desaiganj city | देसाईगंज शहरात मोकाट जनावरांचा हैदोस

देसाईगंज शहरात मोकाट जनावरांचा हैदोस

Next

देसाईगंज शहर हे व्यापारी दृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण आहे. मुख्य राष्ट्रीय महामार्गाने लगतच्या छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यांशी जोडले गेले असल्याने या मार्गावरून नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. शहरातील अनेक पशुपालक जनावरे चरण्यासाठी मोकाट सोडून देत असतात. सदर जनावरे दिवसा भाजीपाला बाजारात टाकून दिलेल्या टाकाऊ भाजीपाल्यावर ताव मारण्यासह चक्क भाजीपाल्याच्या दुकानावर ही तोंड मारत असल्याने हाकलण्याचा प्रयत्न केला असता धुमाकूळ घालत असल्याने भाजीपाला विक्रेत्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

रात्रीच्या वेळेला मोकाट जनावरे राष्ट्रीय महामार्गावर घोळक्याने बस्तान मांडून बसत असल्याने अनेकदा मुख्य मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा होते. दरम्यान, गंभीर अवस्थेत रुग्णवाहिकेने रुग्णाला अति तत्काळ सेवेत हलविण्यात येत असताना मुख्य मार्गांवर बस्तान ठोकून बसलेल्या जनावरांमुळे मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे गंभीर रुग्णास वेळेत उपचार न मिळाल्यास जीवितास धोका होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. नगर परिषद प्रशासनाने या बाबीची तत्काळ दखल घेऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्यास व अनुचित घटना घडल्यास घडलेल्या घटनेस नगर प्रशासनास सर्वस्वी जबाबदार धरून आंदोलन करण्याचा इशारा शहरातील सुजाण नागरिकांनी दिला आहे.

310821\3627img_20210831_081359.jpg

देसाईगंज शहराच्या हुतात्मा स्मारकासमोर राज्यमहामार्गावर असतात जनावरे बसुन.

Web Title: Hados of Mokat animals in Desaiganj city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.