नागपूरला जाणाऱ्या बसेसमध्ये निम्मेच प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:38 AM2021-04-02T04:38:35+5:302021-04-02T04:38:35+5:30
मात्र, काेराेनाचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी नागपुरात बरीच निर्बंध घालण्यात आली आहेत. यामध्ये नागपूर शहरात जाणाऱ्या बसमध्ये केवळ २२ ...
मात्र, काेराेनाचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी नागपुरात बरीच निर्बंध घालण्यात आली आहेत. यामध्ये नागपूर शहरात जाणाऱ्या बसमध्ये केवळ २२ प्रवासीच बसविण्याची अट घालण्यात आली आहे. यासाठी उमरेडपासूनच तपासणी केली जाते. केवळ २२ प्रवासी असल्यास डिझेलचाही खर्च भरून निघणे कठीण हाेत आहे. नागपुरातून येणाऱ्या बसेसमध्येही अर्धेच प्रवासी बसविले जात आहेत. याचा फटका गडचिराेली आगाराला बसत आहे.
बाॅक्स .......
राेज १६ फेऱ्या
गडचिराेली आगाराला सर्वाधिक उत्पन्न नागपूर बसफेऱ्यांमधून मिळते. त्यामुळे काही बसेस नागपूर येथे रात्री मुक्कामी राहतात. तसेच सकाळी ५.३० वाजेपासून बसेस नागपूरसाठी प्रत्येक अर्धा ते एका तासाने बसेस साेडल्या जातात.
नागपूरसाेबतच आरमाेरी, ब्रह्मपुरी, नागभिड, भिवापूर, उमरेड आदी परिसरात ये-जा करण्यासाठीसुद्धा प्रवासी याच बसेसचा वापर करतात.
बाॅक्स ......
गडचिराेली आगारात दाेन शिवशाही
गडचिराेली आगाराला दाेन शिवशाही बसेस देण्यात आल्या आहेत. या बसेस पूर्णपणे वातानुकूलित आहेत. सामान्य बसपेक्षा या बसची तिकीट अधिक आहे. त्यामुळे या बसला फारसे प्रवासी मिळत नाही. उन्हाळ्यात थाेडेफार प्रवासी मिळतील, अशी अपेक्षा आहे.
बाॅक्स ....
जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटली
चंद्रपूर, नागपूर व इतर माेठ्या शहरांमध्ये काेराेना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक माेठ्या शहरात जाण्यासाठी कचरत आहेत. परिणामी एसटीलाही प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. काेराेना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन लांब पल्ल्याच्या बसेस कमी केल्या जात आहेत.
बाॅक्स .....
दुर्गम भागातील बसेस फुल्ल
गडचिराेली जिल्ह्यातही काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र विविध प्रशासकीय कामे करण्यासाठी नागरिकांना गडचिराेली येथेच यावे लागत असल्याने दुर्गम भागातील बसफेऱ्यांना चांगले प्रवासी मिळत आहेत. दुर्गम भागात जाणारी बस गडचिराेली येथूनच फुल्ल हाेते.
काेट ......
नागपूरमध्ये प्रवेश करतेवेळी बसमध्ये केवळ २२ प्रवासी असणे आवश्यक आहे. तशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्याने एसटीकडून नियमांचे पालन केले जात आहे. मात्र निम्म्या प्रवाशांमुळे एसटीच्या उत्पन्नावर फार माेठा परिणाम हाेत आहे.
- मंगेश पांडे, आगार प्रमुख, बसस्थानक गडचिराेली