निम्म्याच शाळा प्रगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:28 PM2017-10-23T23:28:06+5:302017-10-23T23:28:18+5:30

शिक्षण विभागाने ठरवून दिलेले २५ निकष पूर्ण करणाºया शाळेला प्रगत शाळा म्हणून घोषित केले जाते.

Half of the schools are advanced | निम्म्याच शाळा प्रगत

निम्म्याच शाळा प्रगत

Next
ठळक मुद्देमोहीम थंडावली : शाळांमध्ये सोईसुविधांचा अभाव; शिक्षकांचे मन लागेना

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शिक्षण विभागाने ठरवून दिलेले २५ निकष पूर्ण करणाºया शाळेला प्रगत शाळा म्हणून घोषित केले जाते. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २ हजार २३ शाळा आहेत. यापैकी केवळ १ हजार ३७ शाळा प्रगत असून सुमारे ९८६ शाळा प्रगतसाठी अजूनही संघर्ष करीत आहेत.
प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमाअंतर्गत २२ जून २०१६ रोजी राज्य शासनाने प्रगत शाळेचे २५ निकष ठरवून दिले. यामध्ये शाळेतील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, अध्यापनात डिजिटल साधनांचा वापर, पायाभूत चाचणीतील विद्यार्थ्यांचे गुण, त्या वर्गाच्या विद्यार्थ्यांमधील अध्यापन क्षमता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळेच्या मार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम आदींचा समावेश आहे. ही किमान २५ निकष पूर्ण करणाºया शाळेला प्रगत शाळा म्हणून घोषित केले जाते.
शासन निर्णय काढल्यानंतर शाळा प्रगत करण्यासाठी मागील वर्षीच्या शैक्षणिक सत्रात शाळा, केंद्र व जिल्ह्यात मोठी स्पर्धा होत होती. शाळा प्रगत व्हावी, यासाठी शिक्षक धडपडतही होते. शाळा प्रगत करण्यासाठी शिक्षण विभागावर दबाव होता. यावर्षी मात्र हा दबाव पूर्णपणे हटल्याने शिक्षकांनी शाळांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी शाळा प्रगत करण्याची मोहीम थंडावली असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात १ हजार २०२ प्राथमिक शाळा, ८२१ उच्च प्राथमिक शाळा अशा एकूण २ हजार २३ शाळा आहेत. त्यापैकी ६९१ प्राथमिक शाळा व ३४६ उच्च प्राथमिक शाळा प्रगत म्हणून घोषित केल्या आहेत. अजूनही ३२१ प्राथमिक शाळा व ४७५ उच्च प्राथमिक शाळा अप्रगत आहेत. या शाळांना प्रगतशील शाळा असे संबोधण्यात आले आहेत. उर्वरित शाळांमध्येही सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन त्या प्रगत करण्याची मागणी होत आहे.

अध्यापनापेक्षा बदलीकडेच जास्त लक्ष
ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेत पूर्णपणे बदल केला आहे. मे महिन्यात शिक्षकांच्या बदल्या नाही. बदलीपात्र शिक्षकांकडून वेळोवेळी माहिती मागितली जात आहे. याच प्रक्रियेत शिक्षकवर्ग मागील चार महिन्यांपासून अडकला आहे. अध्यापनापेक्षा बदलीच्याच चर्चा शिक्षकांमध्ये अधिक होत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Half of the schools are advanced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.