आश्रमशाळांमध्ये निम्मेच विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:13 PM2017-09-18T23:13:44+5:302017-09-18T23:14:12+5:30

गडचिरोली प्रकल्पांतर्गत येणाºया २४ आश्रमशाळांची विद्यार्थी प्रवेश क्षमता १२ हजार ४५० एवढी आहे.

Half of the students in ashram schools | आश्रमशाळांमध्ये निम्मेच विद्यार्थी

आश्रमशाळांमध्ये निम्मेच विद्यार्थी

Next
ठळक मुद्देगडचिरोली प्रकल्पातील भयावह वास्तव : १२ हजार ४५० पैकी केवळ ७ हजार १८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश

दिगांबर जवादे। लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली प्रकल्पांतर्गत येणाºया २४ आश्रमशाळांची विद्यार्थी प्रवेश क्षमता १२ हजार ४५० एवढी आहे. मात्र चालू शैक्षणिक सत्रात केवळ ७ हजार १८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून ५ हजार ३१९ जागा शिल्लक आहेत.
जंगल भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासींच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी शासनाने निवासाची सुविधा असलेल्या आश्रमशाळा निर्माण केल्या. गडचिरोली आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत एकूण २४ शासकीय आश्रमशाळा आहेत. यातील सर्वच शाळांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध होती. मात्र मागील काही दिवसांपासून आदिवासीबहूल भागातील परिस्थिती बदलली आहे. ‘गाव तिथे शाळा’ या धोरणांतर्गत शासनाने गावागावात शाळा सुरू केल्या. त्याचबरोबर आश्रमशाळांची असलेली दुरावस्था यामुळे पालक आपल्या पाल्याला आश्रमशाळेत पाठविण्यास तयार होत नाही. परिणामी मागील सात ते आठ वर्षांपासून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली आहे.
गडचिरोली प्रकल्पातील २४ शासकीय आश्रमशाळांची विद्यार्थी प्रवेश क्षमता १२ हजार ४५० एवढी आहे. मात्र २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात केवळ ७ हजार १८१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. यामध्ये ३ हजार ५६२ मुले व ३ हजार ६१९ मुलींचा समावेश आहे. सुमारे २ हजार ४८८ विद्यार्थ्यांच्या तर २ हजार ८३१ विद्यार्थिनींच्या जागा शिल्लक आहेत. एकेकाळी आश्रमशाळेत प्रवेशाची मेरीट लिस्ट लागत होती. आता मात्र कर्मचाºयांना शोध माहीम राबवावी लागत आहे.
चार आश्रमशाळांचे प्राथमिक वर्ग बंद
माध्यमिकच्या तुलनेत प्राथमिक वर्गांची विद्यार्थी संख्या कमालीची घटत चालली होती. काही वर्गांमध्ये २ ते ३ पर्यंत विद्यार्थी शिकत होते. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांवर महिन्याकाठी लाखो रूपये खर्च होत होते. या अनावश्यक खर्चावर लगाम घालण्याठी शासनाने पहिली ते चवथी पर्यंतच्या वर्गांची विद्यार्थी संख्या २० पेक्षा कमी असल्यास हे चारही वर्ग बंद करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला. त्यानुसार गडचिरोली प्रकल्पातील आरमोरी तालुक्यातील भाकरोंडी, कुरंडीमाल, चामोर्शी तालुक्यातील भाडभिडी, कुरखेडा तालुक्यातील घाटी या चार आश्रमशाळांमधील प्राथमिक वर्ग बंद करण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना दुसºया शाळेत स्थानांतरित करण्यात आले आहे. हा नियम पुढेही कायम राहणार असल्याने इतरही आश्रमशाळांचे प्राथमिक वर्ग धोक्यात आले आहेत. आश्रमशाळांची पटसंख्या टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाºयांना भविष्यात पेलावे लागणार आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत ३८६ विद्यार्थी वाढले
मागील वर्षी शासकीय आश्रमशाळांमध्ये ६ हजार ७९५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यामध्ये ३ हजार ३७६ मुले व ३ हजार ४१९ मुलींचा समावेश आहे. यावर्षी मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ३८६ विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढले आहेत. चालू वर्षात एकूण ७ हजार १८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे, उच्च माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Half of the students in ashram schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.