अर्धवट पुलाने रहदारीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:53 AM2018-05-14T00:53:32+5:302018-05-14T00:53:39+5:30

एटापल्ली तालुक्यातील उडेरा-बुर्गी मार्गावर पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र सदर काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने पावसाळ्यापूर्वी सदर काम पूर्ण होणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Halfway road traffic obstacles | अर्धवट पुलाने रहदारीस अडथळा

अर्धवट पुलाने रहदारीस अडथळा

googlenewsNext
ठळक मुद्देपावसाळ्यात वाढणार अडचण : उडेरा-बुर्गी मार्गाच्या दुरूस्तीचे काम संथगतीने सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
बुर्गी : एटापल्ली तालुक्यातील उडेरा-बुर्गी मार्गावर पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र सदर काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने पावसाळ्यापूर्वी सदर काम पूर्ण होणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
तीन वर्षांपूर्वी बुर्गी पोलीस स्टेशनच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम आले होते. उडेरा ते बुर्गी दरम्यानचा मार्ग अतिशय खराब असल्याने सदर मार्ग दुरूस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. तब्बल तीन वर्षांच्या कालावधीनंतर या मार्गाच्या दुरूस्तीला सुरूवात झाली आहे. मात्र सदर काम अतिशय संथगतीने सुरू असल्याचे दिसून येते. सदर भाग नक्षलप्रभावित आहे. त्यामुळे नक्षल बंदचे आवाहन झाल्यानंतर काम ठप्प पडते. परिणामी कामास विलंब होत चालला आहे. बुर्गी जवळ कंत्राटदाराने पुलाचे बांधकाम करण्यासाठी रस्ता खोदून ठेवला आहे. तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याच्या बाजुने बायपास मार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र या बायपास मार्गाने जड वाहन नेणे शक्य होत नाही. पावसाचे पाणी बाजुला साचल्यानंतर रहदारी बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी बांधकाम पूर्ण करण्याची मागणी आहे.

Web Title: Halfway road traffic obstacles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.