हातपंपामुळे निमलगुडमची पाणी समस्या सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:38 AM2021-05-21T04:38:57+5:302021-05-21T04:38:57+5:30
त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात येथे निर्माण हाेणारी पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे. निमलगुडम येथे दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण हाेते. ...
त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात येथे निर्माण हाेणारी पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे.
निमलगुडम येथे दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण हाेते. ही समस्या साेडविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात हाेती. यावर्षीही नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तेंदू हंगामात महिला पिण्याच्या पाण्यासाठी जलस्त्राेतांवर गर्दी करीत हाेते. ही बाब सामाजिक कार्यकर्ते नागेश शिर्लावार यांनी सरपंच सरोजा पेंदाम, उपसरपंच प्रफुल नागुलवार यांना सांगितली. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेतून हातपंप खोदकाम करण्यात आले. त्यामुळे येथे पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. हातपंप खोदकामाचे उद्घाटनप्रसंगी सरपंच सरोजा पेंदाम, उपसरपंच प्रफुल नागुलवार, प्रभाग क्र. १ च्या सदस्य जयश्री आत्राम, सामाजिक कार्यकर्ते नागेश शिर्लावार, राकेश सोयाम, रमेश बामणकर, विनोद मडावी, सुनील सोयाम, अशोक कोडापे आदी उपस्थित होते.