हातगाडीमुळे डाेक्यावरील भाजीपाल्याचा भार झाला कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:40 AM2021-09-22T04:40:27+5:302021-09-22T04:40:27+5:30
ताराबाई या मागील अनेक वर्षांपासून भाजीपाल्याचा व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायावरचे त्या कुटुंबाचे पालन पाेषण करीत आहेत. काही महिन्यांपूर्वी ...
ताराबाई या मागील अनेक वर्षांपासून भाजीपाल्याचा व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायावरचे त्या कुटुंबाचे पालन पाेषण करीत आहेत. काही महिन्यांपूर्वी भाजीपाला विक्रीस उपयुक्त ठरणारी तिची हातगाडी मोडकळीस आली. नवीन हातगाडी घेण्याइतका भांडवल तिच्याकडे नव्हते. तरीही या महिलेने हार न मानता स्वतःच्या डोक्यावर भाजीपाल्याच्या भार सोसून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरूच ठेवला. अशातच प्रभाग क्र. २ मध्ये राहणाऱ्या युवकांनी नंदू नाकतोडे यांच्या पुढाकाराने स्वतः पैसे गोळा करून त्या महिलेला एक नवीन हातगाडी भेट दिली. त्यावेळी त्या महिलेचे आनंदाश्रू अनावर झाले. हाेतकरू व गरजू महिलेच्या पाठीशी उभे राहिल्याने तिच्या व्यवसायास प्रोत्साहन वाढविल्याने या युवकांचे कौतुक होत आहे. हातगाडी भेट देताना भाजप युवा नेते पंकज खरवडे, नगरसेवक मिथुन ठाकरे, अमोल खेडकर, जितू ठाकरे, संजय ठाकरे, अमित राठोड, शिलवंत वासनिक, विक्की रोडगे, रूपेश पुणेकर, छोटू लाडे हे उपस्थित होते.