हवाई सफर करून परतलेल्या हर्षल लोथेचा कुरखेडाच्या शिवाजी शाळेत सत्कार
By admin | Published: June 28, 2016 01:18 AM2016-06-28T01:18:22+5:302016-06-28T01:18:22+5:30
येथील शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी हर्षल मधुकर लोथे हा लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेत नागपूर-दिल्ली-नागपूर या हवाई
कुरखेडा : येथील शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी हर्षल मधुकर लोथे हा लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेत नागपूर-दिल्ली-नागपूर या हवाई सफरचा विजेता ठरला. शुक्रवारी त्याने हवाई सफर केली. त्यानंतर सोमवारी तो पहिल्याच दिवशी शाळेत दाखल झाल्यानंतर शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंदराव गेडाम यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
शिवाजी हायस्कूलमध्ये पहिल्याच दिवशी प्राथनेनंतर शाळेच्या रंगमंचावर त्याचा मुख्याध्यापक गेडाम व शिक्षकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी लोकमतचे तालुका प्रतिनिधी सिराज पठाण, शहर प्रतिनिधी संदीप बावणकुळे, सामाजिक कार्यकर्ते राकेश चव्हाण उपस्थित होते. हर्षलने दिल्ली भेटीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला व दिल्लीतील ऐतिहासिक स्थळांना भेटीही दिल्या. लोकमतमुळे आपल्याला हवाई सफरची संधी मिळाली. हे आपले भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.