वेळेपूर्वीच कापूस करपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 09:51 PM2018-11-25T21:51:26+5:302018-11-25T21:51:50+5:30

आॅगस्ट महिन्यापासून पावसाने उसंत घेतल्याने याचा फार मोठा परिणाम कापूस पिकावर झाला आहे. वेळेपूर्वीच कापूस करपण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Before harvesting cotton | वेळेपूर्वीच कापूस करपला

वेळेपूर्वीच कापूस करपला

googlenewsNext
ठळक मुद्देउत्पादनावर होणार परिणाम : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढले होते क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आॅगस्ट महिन्यापासून पावसाने उसंत घेतल्याने याचा फार मोठा परिणाम कापूस पिकावर झाला आहे. वेळेपूर्वीच कापूस करपण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, असे शेतकरी कापूस व सोयाबिन या पिकांची लागवड करतात. पाच वर्षांपूर्वी कोरडवाहू जमिनीत सोयाबिन पिकाचीच लागवड केली जात होती. मात्र सोयाबिनचे उत्पादन कमी होऊन दरवर्षी शेतकºयांना तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे सोयाबिन उत्पादक शेतकरी आता कापूस पिकाकडे वळला आहे. विशेष करून गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, सिरोंचा या तालुक्यातील शेतकरी कापूस पिकाची लागवड करीत आहे. मागील वर्षी कापूस पिकासाठी चांगले वातावरण होते. त्यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक उत्पादन झाले होते. यामुळे इतरही शेतकऱ्यांना प्रेरणा मिळून त्यांनी इतर सर्व पिकांना फाटा देत कापूस पिकाची लागवड केली होती. मात्र यावर्षी कापसानेही दगा दिला आहे.
पावसाळ्याच्या सुरूवातीला दरदिवशी पाऊस पडत असल्याने कापूस पिकाची वाढ खुंटली होती. त्यानंतर आॅगस्ट महिन्यानंतर पावसाने कायमची उसंत घेतली आहे. आॅगस्ट महिन्यापासून कापसाला बोंड येण्यास सुरूवात झाली होती.
सप्टेंबर किंवा आॅक्टोबर महिन्यात एखादा पाऊस येणे आवश्यक होते. मात्र पाऊस झाला नाही. परिणामी जमिनीतील ओलावा कमी होऊन कापूस करपण्यास सुरूवात झाली आहे. कापसाचे जवळपास तीन तोडे केले जातात. शेवटचा तोडा फेब्रुवारी ते मार्च महिन्यात केला जातो. यावर्षी मात्र नोव्हेंबर महिन्यातच पाऊस करपण्यास सुरूवात झाली आहे. डिसेंबर महिन्यात कापूस पूर्णपणे करपणार आहे.
परिणामी तिसरा तोडा होणार नसल्याने कापसाच्या उत्पादनात कमालीची घट येणार आहे. काही शेतकऱ्यांचा तर खर्चही भरून निघणे कठीण होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
कापूस खरेदी केंद्र आवश्यक
गडचिरोली जिल्ह्यात जवळपास १० हजार पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केली जाते. आधुनिक तंत्रज्ञान व साधन सामग्रीचा वापर करून शेती केली जात असल्याने दरवर्षी कापसाखालील क्षेत्र वाढत चालले आहे. मात्र कापूस विक्रीची कोणतीच सुविधा गडचिरोली जिल्ह्यात उपलब्ध नाही. परिणामी कापूस खासगी व्यापाऱ्याला विकावे लागते. बाजारपेठेतील कापसाचा भाव व व्यापाऱ्याकडून दिला जाणारा कापसाचा भाव यामध्ये फार मोठी तफावत राहते. मात्र पर्याय नसल्याने व्यापाऱ्यालाच कापूस विकावा लागते. चामोर्शी, सिरोंचा तालुक्यातील शेतकरी तेलंगणा राज्यात विक्री करतात. तेलंगणा राज्यातील व्यापारी कापूस खरेदीसाठी सिरोंचा तालुक्यात दाखल होतात. शासनाने धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत असली तरी याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

Web Title: Before harvesting cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस