वऱ्हाड्यांची ट्रॅक्टरमधून धोकादायक वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 11:15 PM2019-05-25T23:15:52+5:302019-05-25T23:16:32+5:30
गेल्या दीड महिन्यापासून अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात लग्नसमारंभाची धूम सुरू आहे. वाढत्या तापमानातही ग्रामीण भागातील अनेक लग्नवºहाडी ट्रॅक्टरमधून धोकादायक प्रवास करीत आहेत. विशेष म्हणजे, हा प्रकार सिरोंचा तालुक्याच्या अंकिसा परिसरात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंकिसा : गेल्या दीड महिन्यापासून अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात लग्नसमारंभाची धूम सुरू आहे. वाढत्या तापमानातही ग्रामीण भागातील अनेक लग्नवºहाडी ट्रॅक्टरमधून धोकादायक प्रवास करीत आहेत. विशेष म्हणजे, हा प्रकार सिरोंचा तालुक्याच्या अंकिसा परिसरात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
अहेरी उपविभागात स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही पक्के रस्ते नाही. अनेक दुर्गम व अतिदुर्गम गावाला जाण्यासाठी पायवाटेचाच आधार घ्यावा लागतो. ट्रॅक्टर व बैलबंडी जाऊ शकेल, अशा स्वरूपाचे कच्चे रस्ते आहेत. त्यामुळे या भागात कित्येक दुर्गम गावांना राज्य परिवहन महामंडळाची बस पोहोचत नाही. तसेच खासगी बसगाड्याही जात नाही. त्यामुळे लग्नवºहाड्यांना ट्रॅक्टरमधून लग्न समारंभाच्या ठिकाणी पोहोचावे लागत आहे. सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील अनेक लोक वºहाड्यांना ने-आण करण्यासाठी भाडेतत्वावर ट्रॅक्टर घेत आहे. सिरोंचा तालुक्यालगतच्या तेलंगणा राज्यातूनही अंकिसा भागाकडे ट्रॅक्टरमधून लग्न वºहाड्यांची वाहतूक होत असल्याचे दिसून येते. सिरोंचा तालुक्याचा तेलंगणा राज्यातील लोकांशी निकटचे संबंध आहे. सिरोंचा तालुका व तेलंगणातील लोकांमध्ये रोटीबेटी व्यवहारही चालतो. अहेरी उपविभागात अनेक गावांमध्ये लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.