चार महिन्यांचे निराधारांचे अनुदान मिळालेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:34 AM2021-03-06T04:34:29+5:302021-03-06T04:34:29+5:30
अंध, अपंग, वृद्ध, निराधार, विधवा, परित्यक्ता यांना सन्मानाने जगता यावे याकरिता मदत म्हणून एक हजार रुपये अनुदान दिले जाते. ...
अंध, अपंग, वृद्ध, निराधार, विधवा, परित्यक्ता यांना सन्मानाने जगता यावे याकरिता मदत म्हणून एक हजार रुपये अनुदान दिले जाते. धानाेरा तालुक्यात श्रावणबाळ योजनेचे ३ हजार ३७४ व संजय गांधी योजनेचे १ हजार ८२० असे एकूण ५ हजार १९४ लाभार्थी आहेत. सर्व लाभार्थ्यांचे चार महिन्यांचे अनुदान मिळाले नाही. अनुदान बँकेत जमा झाले की नाही, हे पाहण्यासाठी तालुक्यातील निराधार लाभार्थी वारंवार बँकेत हेलपाटे मारत आहेत. यात त्यांना मानसिक त्रासासह आर्थिक भूर्दंड साेसावा लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून अनुदान लवकर द्यावे, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.
कोट
शासनाकडून निधी न आल्याने निराधारांचे अनुदान मिळण्यास विलंब हाेत आहे. निधी प्राप्त होताच अनुदार वितरीत केले जाईल. श्रावणबाळ योजनेचा दोन महिन्यांचा निधी नुकताच प्राप्त झाला आहे. तो लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.
धनराज वाकुळकर, नायब तहसीलदार, संजय गांधी याेजना विभाग धानोरा