कंबरभर पाण्यातून त्याने काढला मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 05:00 AM2022-07-15T05:00:00+5:302022-07-15T05:00:25+5:30
गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने संध्याकाळपर्यंत गाढवी नदीची पाणीपातळी चांगलीच वाढली होती. आरमोरी-वैरागड मार्गावरील रामाळा घाटावरच्या पुलावर ३ ते ४ फूट पाणी होते. अशाही स्थितीत घरी पोहोचण्यासाठी या शेतकऱ्याने कमरेपेक्षा जास्त पाणी असताना पुलावरून चालत पैलतीर गाठण्याचे ठरविले. त्यांचे हे धाडस अपघाताला आमंत्रण देणारे ठरले असते. पण ते कसेतरी पैलतीर गाठण्यात यशस्वी झाले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : वैरागड ते आरमोरी मार्गावरील रामाळा घाटामध्ये असलेल्या गाढवी नदीच्या पुलावरून बुधवारी कमरेपेक्षा जास्त पाणी वाहत होते. अशा स्थितीतही जीव धोक्यात घालून एका शेतकऱ्याने पूल ओलांडण्याचे धाडस दाखविले. त्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला असला तरी असे नसते धाडस जीवावर बेतण्याची शक्यता असते. त्यामुळे असा प्रयत्न कोणीही करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरमोरी येथील एका शेतकऱ्याची रामाळा येथे शेती आहे. बुधवारी तो शेतावर गेला होता. दरम्यान, गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने संध्याकाळपर्यंत गाढवी नदीची पाणीपातळी चांगलीच वाढली होती. आरमोरी-वैरागड मार्गावरील रामाळा घाटावरच्या पुलावर ३ ते ४ फूट पाणी होते. अशाही स्थितीत घरी पोहोचण्यासाठी या शेतकऱ्याने कमरेपेक्षा जास्त पाणी असताना पुलावरून चालत पैलतीर गाठण्याचे ठरविले. त्यांचे हे धाडस अपघाताला आमंत्रण देणारे ठरले असते. पण ते कसेतरी पैलतीर गाठण्यात यशस्वी झाले.
पोलीस बंदोबस्त ठेवा
वास्तविक पुराच्या पाण्याचा वेग अधिक असतो. याशिवाय खाली गाळ जमलेला असल्यामुळे पाण्यातून जाताना पाय घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे असे धाडस कोणी करू नये आणि अनुचित घटना टाळण्यासाठी अशा पुलांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.