चाेरीच्या पैशाच्या वादातून त्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2022 10:57 PM2022-09-24T22:57:47+5:302022-09-24T22:58:24+5:30

१८ सप्टेंबर राेजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तीनही आराेपी व मृत युवक हे तलावाच्या पाळीवर दारू पिण्यासाठी एकत्र आले. दारूच्या हिश्शावरून कुमाेद व राेशन यांच्यामध्ये भांडण झाले. या भांडणादरम्यान राेशनने लाेखंडी राॅडने कुमाेदच्या डाेक्यावर जबर प्रहार केला. यात कुमाेद जागीच गतप्राण झाला. ताे मरण पावल्याचे लक्षात आल्यानंतर आराेपींनी त्याला पाण्यात ढकलून दिले. मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला.

He was killed due to a dispute over Chari's money | चाेरीच्या पैशाच्या वादातून त्याची हत्या

चाेरीच्या पैशाच्या वादातून त्याची हत्या

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली :  रेव्हेन्यू काॅलनीतील कुमाेद लाटकर या युवकाचा मंगळवार, २० सप्टेंबर राेजी आठवडी बाजाराजवळ असलेल्या तलावात मृतदेह आढळला हाेता. या प्रकरणातील दाेन आराेपींना गडचिराेली पाेलिसांनी माेठ्या शिताफीने २३ सप्टेंबर राेजी अटक केली. चाेरीच्या पैशाच्या वादातूनच एका आराेपीने कुमाेदची हत्या केल्याचा पाेलिसांचा अंदाज  आहे. 
राेशन पवनसिंग ठाकूर (३५) व अमाेल नामदेव दडमल (२५) (दाेघेही रा. चनकाई नगर, गडचिराेली) अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत. तर नीलेश मारकवार हा आराेपी फरार आहे. १८ सप्टेंबर राेजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तीनही आराेपी व मृत युवक हे तलावाच्या पाळीवर दारू पिण्यासाठी एकत्र आले. दारूच्या हिश्शावरून कुमाेद व राेशन यांच्यामध्ये भांडण झाले. या भांडणादरम्यान राेशनने लाेखंडी राॅडने कुमाेदच्या डाेक्यावर जबर प्रहार केला. यात कुमाेद जागीच गतप्राण झाला. ताे मरण पावल्याचे लक्षात आल्यानंतर आराेपींनी त्याला पाण्यात ढकलून दिले. मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. मृतक कुमाेद हा चाेरी करायचा तसेच त्याला दारूचे व्यसन हाेते. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात हाेता. मात्र, शवविच्छेदनादरम्यान त्याच्या डाेक्यावर वार आढळून आले.  त्यामुळे त्याची हत्याच झाल्याचे स्पष्ट झाले. यातील दाेन आराेपींना अटक केली असून, तिसरा आराेपी फरार आहे. दरम्यान, अटक केलेल्या आराेपींना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे. 
रात्रीची घटना असल्याने आराेपींचा शाेध घेणे अतिशय कठीण काम हाेते. गडचिराेली पाेलीस ठाण्याचे ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात एपीआय पूनम गाेरे, पीएसआय संघमित्रा खाेब्रागडे, स्नेहल चव्हाण, चेतनसिंग चव्हाण यांनी गाेपनीय माहिती काढत आराेपींना अटक केली. 

आराेपी व मृतक करायचे चाेरी 
आराेपी राेशन ठाकूर हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आहे. त्याच्यावर चाेरीचे तीन, दारू विक्रीचा एक गुन्हा दाखल आहे. राेशन एका चाेरीच्या गुन्ह्यात तुरूंगात गेला हाेता. ताे नुकताच जामिनावर सुटून आला हाेता. यादरम्यान ताे व कुमाेद दाेघेही चाेरी करायचे, अशी कबुली राेशनने दिली आहे. चाेरीच्या पैशाच्या वादातूनच त्याने हत्या केल्याचा अंदाज आहे. 

गुन्हा कराल तर सुटणार नाही 
मागील सहा महिन्यांच्या कालावधीत गडचिराेली पाेलीस ठाण्यांतर्गत चार खुनाचे गुन्हे घडले आहेत. यात आशीर्वाद नगरातील युवकाचा खून, पुलखल येथील युवकाचा खून, राम नगरातील व्यक्तीचा खून, कुमाेदच्या हत्येच्या प्रकरणाचा समावेश आहे. या चारही प्रकरणांत आराेपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गडचिरेाली पाेलीस ठाण्याचे ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात पाेलिसांनी चारही प्रकरणांतील आराेपींना जेरबंद केले आहे.

पूर्वनियाेजित कट रचून हत्या
दारूच्या नशेत आपण कुमाेदची हत्या केल्याचे राेशन पाेलिसांना सांगत आहे. मात्र, पाेलिसांचा त्याच्या बाेलण्यावर विश्वास नाही. कारण तलावाच्या पाळीवर लाेखंडी राॅड आला कुठून, असा प्रश्न आहे. खून करण्याच्या इराद्यानेच राेशनने लाेखंडी राॅड साेबत आणून पूर्वनियाेजित कट रचून हत्या केल्याचा अंदाज आहे.

 

Web Title: He was killed due to a dispute over Chari's money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.