मागेल त्याला मिळणार इंटरनेट जाेडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:36 AM2021-04-11T04:36:07+5:302021-04-11T04:36:07+5:30

ठाणेगाव येथे वायफाय चौपाल प्रकल्पाला दिली भेट गडचिरोली: कुरखेडा, वडसा, आरमोरी गडचिरोली, चामोर्शी व मुलचेरा या सहा तालुक्यातील गावांमध्ये ...

He will get internet connection later | मागेल त्याला मिळणार इंटरनेट जाेडणी

मागेल त्याला मिळणार इंटरनेट जाेडणी

googlenewsNext

ठाणेगाव येथे वायफाय चौपाल प्रकल्पाला दिली भेट

गडचिरोली: कुरखेडा, वडसा, आरमोरी गडचिरोली, चामोर्शी व मुलचेरा या सहा तालुक्यातील गावांमध्ये इंटरनेट केबल पाेहाेचले आहे. त्या गावातील गरजू लाेकांना इंटरनेटची जाेडणी माफक दरात उपलब्ध हाेईल. तसेच गावातील मुख्य ठिकाणी वायफाय सेवा माेफत दरात उपलब्ध हाेईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले.

भारत नेट प्रकल्पांतर्गत मागील दाेन वर्षांपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये ग्राम पातळीपर्यंत इंटरनेटचे जाळे पसरविण्याचे कार्य सुरू आहे. याच प्रकल्पांचा एक भाग म्हणून सीएससी व बीबीएनएल या कंपनीकडून ग्रामपंचायतची जोडणी पूर्ण झालेली आहे. जिल्ह्यातील बारा तालुक्यांपैकी सध्या पहिल्या टप्प्यात सहा तालुक्यांमध्ये सदर प्रकल्प राबविला जात आहे. पहिल्या टप्प्यात कुरखेडा, वडसा, आरमोरी गडचिरोली, चामोर्शी व मुलचेरा या तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ग्रामपंचायत पर्यंतची मुख्य जोडणी १०० टक्के पूर्ण झालेली आहे. आता ग्रामपंचायत मधून गावातील प्रत्येकी पाच शासकीय कार्यालयांना इंटरनेटची जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. या जोडणी मध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा जोडणीला प्राधान्य देण्याची निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांकडून सी एस सी ला देण्यात आले होते. त्याअंतर्गत झालेल्या कामाचे अवलोकन करण्याकरिता जिल्हाधिकारी स्वतः आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे भेट दिली तसेच आरमोरी तालुक्यात इंटरनेट जोडणी करिता सीएससी वाय-फाय चौपाल कार्यक्रमांतर्गत सीएससी केंद्र संचालक पराग हजारे यांच्या केंद्रात प्रस्थापित केलेल्या मिनी ओईलटीची सुद्धा पाहणी केली. या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या कार्य प्रगतीवर समाधान व्यक्त केले. सदर प्रकल्प योग्यरीत्या राबवून जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत इंटरनेटची सेवा उपलब्ध करून देण्याची ग्वाही सीएससी जिल्हा समन्वयक शाहीद शेख यांनी दिली. या प्रसंगी देसाईगंज उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, आरमोरी तहसीलदार कल्याण कुमार दहाट, संवर्ग विकास अधिकारी चेतन शिवांश, महा आयटीचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जयंत मुकुंदवार, बीएनएलचे नेटवर्क इंजिनिअर समीर शेख, जिल्हा व्हीएलई सोसायटीचे अध्यक्ष नसिर हाशमी प्रामुख्याने उपस्थित होते.

बाॅक्स

इतरही तालुक्यांमध्ये भारत नेट कार्यक्रमाला गती देण्याचे निर्देश

सहा तालुके वगळता इतरही तालुक्यांमधील गावे इंटरनेटने जाेडण्याचे काम सुरू आहे. सदर कार्यक्रम युद्धस्तरावर राबवून जोडणीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जोडणीद्वारे गावातील इतर गरजू लोकांना सुद्धा माफक दरात सदर जोडणी उपलब्ध करून इंटरनेटची जिल्ह्यातील एक पोकळी कमी करण्याची सुद्धा सूचना केली. यातून जिह्यातील इंटरनेट समस्या निश्चितच सुटेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. एक गावात एका ठिकाणाहून नागरिकांसाठी नाममात्र दरात वाय-फाय पुरवठा केला जाणार आहे यातून स्थानिक नागरिकांना चांगल्या प्रकारे फायदा होऊन त्यांची कामे मार्गी लावता येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले.

Web Title: He will get internet connection later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.