महावितरणच्या दाेषी अधिकाऱ्यांविराेधात पाेलिसांत तक्रार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:42 AM2021-09-14T04:42:58+5:302021-09-14T04:42:58+5:30

कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा विद्युत वाहिनीवरील फिडरला २२ गावे येतात. या फिडरवरून कृषीपंपाला ८ तास विद्युत पुरवठा देण्यात येतो, त्यातच ...

He will lodge a complaint in the Paelis against the responsible officers of MSEDCL | महावितरणच्या दाेषी अधिकाऱ्यांविराेधात पाेलिसांत तक्रार करणार

महावितरणच्या दाेषी अधिकाऱ्यांविराेधात पाेलिसांत तक्रार करणार

Next

कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा विद्युत वाहिनीवरील फिडरला २२ गावे येतात. या फिडरवरून कृषीपंपाला ८ तास विद्युत पुरवठा देण्यात येतो, त्यातच २ तास विद्युत पुरवठा बिघाडामुळे बंद असतो त्यामुळे फक्त ६ तास पुरवठा मिळतो, त्यामुळे धान पिकाच्या शेवटपर्यंत पाणी जात नाही. पेरणीच्या सुरुवातीपासून पाऊस येत नसल्याने ५० टक्के लोकांची रोवणी थांबली होती. २० ते २२ गावातील शेतकऱ्यांना पाण्याची फार आवश्यकता होती. धान पीक जगावे म्हणून शेतकऱ्यांनी महावितरण कंपनी कुरखेडा कार्यालय गडचिरोलीला २४ तास विद्युत पुरवठा कृषिपंपाला द्या, नाही तर कमीत कमी १६ तास द्या, अशी मागणी निवेदनातून महावितरणकडे करण्यात आली. शेतकऱ्यांचे मोर्चे व धरणे करून कार्यालयाला घेराव आंदोलन केले. १५ ऑगस्टलाही निवेदन दिले. नंतर मुख्य अभियंता देशपांडे,चंद्रपूर कार्यकारी अभियंता गाडगेसह कार्यकारी अभियंता मुरकुटे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल, उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, माजी उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, शेतकरी राकेश खुणे, गुणवंत कवडकर, दशरथ लाडे, सेवादास खुणे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. दरम्यान, काही बिल ३ महिन्यांच्या आत भरा, मग १६ तास विद्युत पुरवठा सुरू करू, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले व तसे लिहून घेतले; परंतु आजपर्यंत १६ तास विद्युत पुरवठा दिला नाही.

बाॅक्स :

प्रसंगी आंदोलन करू

विद्युत पुरवठा न दिल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान पेरणी व रोवणी खरडून गेली. याला दोषी असलेले महावितरणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्य अभियंता देशपांडे, कार्यकारी अभियंता गाडगेसह कार्यकारी अभियंता मुरकुटे आहेत, असा आराेप केला आहे. या अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. याबाबतची तक्रार लवकरच कुरखेडा पोलीस स्टेशनला देणार असून, अटक करण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन करू, असा इशारा चंदेल यांनी दिला आहे.

Web Title: He will lodge a complaint in the Paelis against the responsible officers of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.