गराेदर महिलांच्या लसीकरणाबाबत आरोग्य प्रशासन अजूनही संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:45 AM2021-07-07T04:45:04+5:302021-07-07T04:45:04+5:30

गडचिराेली : काेराेना प्रतिबंधात्मक लस गराेदर मातांना देण्याबाबत राज्य व देशपातळीवरील मंत्रालयात मंथन सुरू आहे. गराेदर मातांना काेराेना प्रतिबंधात्मक ...

The health administration is still confused about the immunization of women | गराेदर महिलांच्या लसीकरणाबाबत आरोग्य प्रशासन अजूनही संभ्रमात

गराेदर महिलांच्या लसीकरणाबाबत आरोग्य प्रशासन अजूनही संभ्रमात

Next

गडचिराेली : काेराेना प्रतिबंधात्मक लस गराेदर मातांना देण्याबाबत राज्य व देशपातळीवरील मंत्रालयात मंथन सुरू आहे. गराेदर मातांना काेराेना प्रतिबंधात्मक लस देण्याबाबत शासनस्तरावरून अद्यापही काेणत्याही ठाेस सूचना किंवा मार्गदर्शन जिल्ह्यातील आराेग्य विभागाचे अधिकारी व वैद्यकीय क्षेत्राला मिळाल्या नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यात याबाबत अजूनही संभ्रमावस्था कायम आहे.

प्रसूत मातेला काेविड प्रतिबंधात्मक लस दिली जात असून अनेकांनी ही लस घेतली आहे. त्याचे काेणतेही दुष्परिणाम अजून आढळून आले नाही. आता गराेदर महिलांचे काेविड लसीकरण करण्याबाबतची तयारी शासन व प्रशासन करत आहे. पण त्याबाबत ठोस निर्णय होऊन तशा सूचना आरोग्य विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना मिळाल्याच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बाॅक्स...

अद्यापही स्पष्ट सूचना नाही

- गर्भवती महिलांना काेराेना प्रतिबंधात्मक लस द्यावी की देऊ नये, याबाबत केंद्र व राज्य सरकारच्या आराेग्य विभागाकडून कुठल्याही प्रकारच्या स्पष्ट सूचना अजूनही मिळाल्या नाहीत. गर्भवती मातांना काेराेनाची लस दिल्यावर त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत की नाही, हे ही अजून सिद्ध झाले नाही, अशी माहिती गडचिराेली येथील प्रसूती व स्त्रीराेग तज्ज्ञ डाॅ. वैशाली चलाख यांनी दिली.

- गराेदरपणातील सुरुवातीचे तीन महिन्यात काेराेना प्रतिबंधात्मक लस घेणे धाेक्याचे हाेऊ शकते. गराेदरपणाबाबत सुरुवातीला माहीत नसलेल्या महिलांनी लस घेतल्यावर त्यांचा गर्भपात झाला आहे.

काेट...

गर्भवती महिलांना काेराेना प्रतिबंधात्मक लस देण्याबाबत मंगळवारी संपूर्ण देशभरात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मंथन होणार आहे. गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबत आपण काय करू शकताे, याबाबतच्या सूचना केंद्रीय आराेग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने केल्या आहेत.

- डाॅ. समीर बन्साेडे, जिल्हा माता व बाल संगाेपन अधिकारी, गडचिराेली

Web Title: The health administration is still confused about the immunization of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.