७८ लाेकांची आराेग्य व नेत्र तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:38 AM2021-07-27T04:38:03+5:302021-07-27T04:38:03+5:30
शिबिराचे उद्घाटन ब्रम्हपुरी येथील सामाजिक विचारवंत प्रा. डॉ. युवराज मेश्राम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी दि बुध्दिस्ट सोसायटीचे जिल्हाध्यक्ष अभियंता ...
शिबिराचे उद्घाटन ब्रम्हपुरी येथील सामाजिक विचारवंत प्रा. डॉ. युवराज मेश्राम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी दि बुध्दिस्ट सोसायटीचे जिल्हाध्यक्ष अभियंता नरेश मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून त्रिरत्न समता संघाचे अध्यक्ष चंदुराव राऊत, मुख्य प्रवर्तक विजय बन्सोड, बसवेश्वर महाराजाचे अनुयायी अनिल मुलकलवार उपस्थित हाेते.
दिवसभर चाललेल्या शिबिरात ५४ नागरिकांची आराेग्य तपासणी तर ३३ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. वैभवशाली राजवाड्याचा त्याग करून धम्म निर्माण करणाऱ्या सम्यक सम्बुध्दाच्या धम्माचा जनसेवेतून प्रसार व्हावा. ही अतिशय अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन डॉ. युवराज मेश्राम यांनी केले. या शिबिरात जनरल फिजिशियन डॉ. राहुल राऊत, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजश्री राऊत, नेत्रचिकित्सक डॉ. भाऊराव शेंडे व डॉ. मनस्वी भोवते यांनी रुग्णांची तपासणी केली.
कार्यक्रमाचे संचालन त्रिरत्न समता संघाचे संचालक गौतम लांडगे तर आभार सचिव एम.ए. रामटेके यांनी मानले. यशस्वीतेसाठी सहसचिव गिरीधर मेश्राम, सदस्य राजविलास गायकवाड, संतोष टेंभुर्णे, ललित खोब्रागडे, संतोष ऊके, सचिन बन्सोड, युवराज पंचभाई, सुरेश मेश्राम, डॉ.मोरेश्वर बोरकर तसेच समता बौध्द महिला मंडळ व बौद्ध धम्म प्रसारक मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले.