१०० वर नागरिकांची आराेग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:32 AM2021-02-15T04:32:49+5:302021-02-15T04:32:49+5:30
भामरागड : भामरागडचे उपविभागीय पाेलीस अधिकारी कुणाल साेनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ फेब्रुवारी राेजी नारगुंडा येथे जनजागरण मेळावा घेण्यात आला. ...
भामरागड : भामरागडचे उपविभागीय पाेलीस अधिकारी कुणाल साेनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ फेब्रुवारी राेजी नारगुंडा येथे जनजागरण मेळावा घेण्यात आला. मेळाव्यादरम्यान १०० पेक्षा अधिक नागरिकांची आराेग्य तपासणी करून त्यांना औषधाेपचार पुरविण्यात आला. पाेलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गजबे यांनी शासनाच्या विविध याेजनांची माहिती नागरिकांना दिली. महिलांना शिवणक्लासबाबत माहिती देऊन इच्छुक महिलांना आवश्यक दस्तावेज जमा करण्यास सांगितले. तसेच महिलांना महिला सुरक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. याप्रसंगी नागरिकांची बीपी, शुगर, मलेरिया तपासणी करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यामुळे विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. नागरिकांना ब्लँकेट तर शालेय विद्यार्थ्यांना स्केचपेन व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल, अपर पाेलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पाेलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या जनजागरण मेळाव्याला जवळपास १२५ नागरिक उपस्थित हाेते.