शिबिरात १२० नागरिकांची आराेग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:42 AM2021-08-17T04:42:27+5:302021-08-17T04:42:27+5:30
शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रोहिदास राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कवडू उंदिरवाडे होते. ...
शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रोहिदास राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कवडू उंदिरवाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून तुकाराम दुधे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश सिडाम, डॉ. श्रावंती काेल्लुरी उपस्थित होते.
शिबिरात सिकलसेल, शुगर, ब्लड प्रेशर आदी तपासण्या करण्यात आल्या, तसेच मानसिक आरोग्य, वृद्धांचे आजार, एचआयव्हीबाबत तज्ज्ञ मंडळीकडून मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. उमेश सिडाम व डॉ. श्रावंती काेल्लुरी यांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केला. शिबिरात आरोग्य समुपदेशन किरण रघुवंशी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ स्वप्नील चाफले, सिकलसेल समुपदेशन नीता बालपांडे, एचआयव्ही समुपदेशक समीता वैद्य, औषध संयोजक कीर्ती चिताडे, अधिपरिचारिका टिना मुजुमदार, वैशाली बोबाटे, प्रणाली ठेंगरे, एएनएम शामेश्वरी भंडारे, सामाजिक कार्यकर्ती मिना दिवटे यांनी तांत्रिक सहाय्य व आरोग्य समुपदेशन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हंसराज उंदिरवाडे, संचालन प्रल्हाद सहारे यांनी केले तर गोकुलदास गोवर्धन यांनी आभार मानले. संस्थेचे पदाधिकारी संपत गोडबोले, मोतीराम कोटांगले, दुर्वास टेंभुर्णे, रामचंद्र जांभुळकर, पुरूषोत्तम खेवले आदींनी शिबिर यशस्वीतसाठी सहकार्य केले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी शिबिर आयाेजनाबद्दल समाधान व्यक्त केले.