आलापल्ली येथे आराेग्य तपासणी व वृक्षाराेपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:22 AM2021-07-24T04:22:12+5:302021-07-24T04:22:12+5:30
शिबिराचे उद्घाटन आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम हाेत्या. प्रमुख अतिथी म्हणून ...
शिबिराचे उद्घाटन आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम हाेत्या. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच शंकर मेश्राम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, डॉ. अल्का उईके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, लक्ष्मण येरावार, मलरेड्डी येमनूरवार, नारायण कासेट्टीवार आदी उपस्थित होते.
आरोग्य हीच खरी संपत्ती असून गोरगरिबांच्या आरोग्याची तपासणी व निदान व्हावे यासाठी राज्यव्यापी आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात येत असल्याचे आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुष्पा अलोने, संचालन सुरेंद्र अलोने, तर उपस्थितांचे आभार सारिका गडपल्लीवार यांनी मानले. यावेळी रा. काँ.चे तालुकाध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार, पूर्वा दोंतुलवार, ममता पटवर्धन, सुवर्णा पुसलवार, महेश अलोने, शैलेश पटवर्धन, सोमेश्वर रामटेके, स्वप्नील श्रीरामवार, कैलास कोरेत, मनोज बल्लूवार, मखमूर शेख, संतोष तोरे, राहुल गर्गम, सुमित मोतकूरवार, शुभम चिंतावार तसेच आराेग्य कर्मचारी उपस्थित होते.
230721\img-20210722-wa0051.jpg
अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्य आलापल्लीत आरोग्य शिबीर तसेच वृक्षारोपण कार्यक्रम