कृषक हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांची आराेग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:36 AM2021-02-10T04:36:52+5:302021-02-10T04:36:52+5:30
चामाेर्शी : राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम व राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण रुग्णालय चामाेर्शीच्या वतीने येथील कृषक हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवी ...
चामाेर्शी : राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम व राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण रुग्णालय चामाेर्शीच्या वतीने येथील कृषक हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची आराेग्य तपासणी करण्यात आली तसेच किशाेरवयीनांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम ८ फेब्रुवारीला घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरविंद भांडेकर हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. शेषराव भैयसारे, डॉ. शिल्पा गेडाम, समुपदेशक नागेश मांदेशी, पुरुषोत्तम घ्यार, शिक्षक मोरेश्वर गडकर, गिरीष मुंजमकर, जासुंदा जनबंधू, वर्षा लोहकरे, लोमेश बुरांडे, मारोती दिकोंडवार व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी डॉ. भैसारे यांनी मुला, मुलीमधील आजार, किशोरवयात होणारे शारीरिक व मानसिक बदल, किशोरवयीन आहार, अन्मजात आजार व त्यावरील उपाय, संदर्भात सेवा रक्ताक्षय आजार लक्षणे व उपचार, लैंगिक आचार आदींबाबत तर डॉ. शिल्पा गेडाम यांनी मुलीच्या समस्या मासिक पाळीतील द्यावयाची काळजी, वैयक्तिक स्वच्छता, लैंगिक आजाराबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम घ्यार तर आभार मोरेश्वर गडकर यांनी मानले.