शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:21 AM2019-08-29T00:21:20+5:302019-08-29T00:21:49+5:30

घोट परिसरात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. याही वर्षी शेतकऱ्यांनी बरेच प्रयत्न करून आपल्या शेतात धानपिकाची रोवणी नुकतीच आटोपली. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने पोलीस विभागामार्फत साहित्य वाटपाचा निर्णय घेण्यात आला.

Health inspections of hundreds of citizens | शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी

शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी

Next
ठळक मुद्देबेलगट्टा माल येथे जनजागरण मेळावा : शासकीय योजना, विमा व बँक कर्ज सुविधेबाबत मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : जिल्हा पोलीस प्रशासन गडचिरोली व पोलीस मदत केंद्र घोटच्या संयुक्त विद्यमाने बेलगट्टा माल येथे २५ आॅगस्ट रोजी रविवारला जनजागरण मेळावा घेण्यात आला. दरम्यान यावेळी आरोग्य शिबिरही घेण्यात आले. या शिबिरात घोट परिसरातील शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सदर मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून बेलगट्टा मालचे सरपंच विलास चौधरी, घोट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शीतल चाटे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निरीक्षक नरेश गलबले, कृषी पर्यवेक्षक पी.पी.गजभिये, अनिल चव्हाण, हेमंत फस्के, पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी मिठू जगदाडे यांच्यासह पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील सर्व गावांचे पोलीस पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांनी कृषीविषयक योजनांची माहिती दिली. प्रधानमंत्री सन्मान योजना, जीवन ज्योती विमा योजना तसेच बँकेमार्फत मिळणाऱ्या कर्ज सुविधा आणि आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.शीतल चाटे यांनी आरोग्य तपासणी केली. तसेच कर्मचाऱ्यांमार्फत बी.पी., शुगर, मलेरिया व रक्त तपासणी करण्यात आली. औषध पुरवठाही करण्यात आला. याप्रसंगी प्रभारी पोलीस अधिकारी मिठू जगदाडे यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. गावातील नागरिकांनी कोणतीही अडचण आल्यास पोलिसांची मदत घ्यावी, पोलीस सदैव तत्पर आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मेळाव्याला घोट परिसराच्या १५ ते २० गावांतील शेकडो आदिवासीबांधव, पोलीस कर्मचारी व जवान उपस्थित होते.
शेतकऱ्यांना शेतीपयोगी साहित्याचे वाटप
घोट परिसरात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. याही वर्षी शेतकऱ्यांनी बरेच प्रयत्न करून आपल्या शेतात धानपिकाची रोवणी नुकतीच आटोपली. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने पोलीस विभागामार्फत साहित्य वाटपाचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान बेलगट्टा माल येथे झालेल्या जनजागरण मेळाव्यात अनेक शेतकऱ्यांना फावडे, घमेले व इतर शेतीपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

Web Title: Health inspections of hundreds of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य