आरोग्यवर्धक माेहाचे तेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:25 AM2021-06-25T04:25:47+5:302021-06-25T04:25:47+5:30
सिरोंचा : तालुक्यातील आदिवासी दुर्गम गावात माेहाच्या झाङांचे प्रमाण अधिक आहे. माेहाच्या फुलांचा उपयोग दारू काढण्याबराेबरच विविध खाद्य पदार्थ ...
सिरोंचा : तालुक्यातील आदिवासी दुर्गम गावात माेहाच्या झाङांचे प्रमाण अधिक आहे. माेहाच्या फुलांचा उपयोग दारू काढण्याबराेबरच विविध खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी हाेतो. तसेच माेहाच्या फळांचा उपयोग तेल बनविण्यासाठी होतो.
माेहाचे झाड दारूसाठी बादनाम आहे. परंतु त्याच झाडापासून आरोग्यवर्धक बहुपयोगी तेलाचे उत्पादन होते.
हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. माेहाच्या फळांना ग्रामीण भागात टाेरी संबाेधले जाते. यापासून निघाणाऱ्या तेलाला टोरीतेल म्हणतात. हे तेल फारच उपयोगी आहे.
याचा उपयोग ग्रामीण आदिवासी खाण्यासाठी करतात. तसेच यामध्ये बरेच औषधीयुक्त गुण आहेत. माेहाची फळे मे महिन्यात पिकून गळतात. नागरिक या फळांचा संग्रह करतात आणि तेल काढण्याचे काम जून अखेरपर्यंत चालते.
संग्रहित फळांना उन्हामध्ये सुकवून ठेवले जाते. तेल काढण्याचे काम पहिले घरीच व्हायचे. पण, आता मशीनच्या सहाय्याने तेल काढले जाते.
हे तेल अंगदुखी आणि सुदृढ शरीरासाठी फारच उपयोगी आहे. तसेच पूजेचा दिवा लावण्यासाठीही आदिवासी नागरिक याचा उपयोग करतात.
कंपन्यांच्या तेलामुळे मागणी घटली
पूर्वी या तेलाला माेठी मागणी हाेत हाेती. आता मात्र कंपन्यांचे तेल बाजारात आल्याने या तेलाची मागणी घटली आहे. तरीही शहरातील ज्या नागरिकांना या तेलाचे महत्व माहीत आहे. असे नागरिक ग्रामीण भागात जाऊन हे तेल खरेदी करतात. तसेच ग्रामीण भागातील नागरिकही या तेलाचा वापर करतात.