जिल्हाधिकाºयांनी घेतला आरोग्यसेवेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 08:10 PM2017-07-26T20:10:04+5:302017-07-26T20:53:33+5:30

अहेरी उपविभागातील रुग्णांचा भार अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयावर आहे.

Health Service | जिल्हाधिकाºयांनी घेतला आरोग्यसेवेचा आढावा

जिल्हाधिकाºयांनी घेतला आरोग्यसेवेचा आढावा

googlenewsNext
ठळक मुद्देअडचणी जाणल्या : अहेरी रुग्णालयाला आकस्मिक भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अहेरी उपविभागातील रुग्णांचा भार अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयावर आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाºयांची अनेक पदे रिक्त असून येथे विविध समस्या आहेत. दरम्यान गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी बुधवारी थेट अहेरी गाठून तेथील उपजिल्हा रुग्णालयास आकस्मिक भेट दिली व तेथील आरोग्यसेवेचा आढावा घेतला.
बांधकाम विकास कामाच्या संदर्भात जिल्हा समन्वय समितीची बैठक बुधवारी अहेरी येथील महसूल मंडळ अधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी नायक अहेरीच्या दौºयावर होते. सदर बैठक आटोपल्यानंतर त्यांनी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले उपस्थित होते. ज्यावेळी जिल्हाधिकारी नायक हे उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले त्यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.एल. हकीम हे रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करीत होते.
यावेळी जिल्हाधिकारी नायक यांनी जननी सुरक्षा योजना, सिकलसेल कार्यक्रम व इतर आरोग्य योजना व औषधोपचारांचा आढावा घेतला. याशिवाय अहेरी उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रत्येक वॉर्डात जाऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी केली. दवाखान्यातील पाण्याची सोय, औषधसाठा, रुग्णवाहिका सेवा आदींची माहिती त्यांनी जाणून घेतली.
अहेरी उपविभागातील शेकडो रुग्ण दररोज या रुग्णालयात औषधोपचारासाठी येतात. मात्र रिक्तपदांमुळे रुग्णांची येथे हेळसांड होत असते. सध्या कार्यरत असलेल्या मनुष्यबळावर रुग्णांना चांगली आरोग्यसेवा देण्याचे काम येथील वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकाºयांनी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नायक यांनी यावेळी दिले. पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यामुळे व घाणपाण्याच्या डबक्यामुळे साथीचे व जलजन्य आजार नागरिकांना होण्याची शक्यता अधिक असते, त्यादृष्टिकोनातून वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाºयांनी मुख्यालयी राहून आरोग्यसेवा रुग्णांना पुरवावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी नायक यांनी यावेळी दिल्या. अहेरी उपजिल्हा रुग्णालयात येत्या दोन वर्षात नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीची पाहणी जिल्हाधिकारी नायक यांनी यावेळी केली. याप्रसंगी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Health Service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.