आराेग्य यंत्रणेने कोरोनाविरोधातील लढाईचे आव्हान पेलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:39 AM2021-08-23T04:39:30+5:302021-08-23T04:39:30+5:30

शिवसेना शहरप्रमुख रामकिरीत यादव व माजी नगराध्यक्षा डाॅ. अश्विनी यादव यांच्या पुढाकाराने शिवसेनेच्या वतीने गडचिरोली शहरातील मंगल कार्यालयात २१ ...

The health system challenged the fight against corona | आराेग्य यंत्रणेने कोरोनाविरोधातील लढाईचे आव्हान पेलले

आराेग्य यंत्रणेने कोरोनाविरोधातील लढाईचे आव्हान पेलले

Next

शिवसेना शहरप्रमुख रामकिरीत यादव व माजी नगराध्यक्षा डाॅ. अश्विनी यादव यांच्या पुढाकाराने शिवसेनेच्या वतीने गडचिरोली शहरातील मंगल कार्यालयात २१ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्यातील १२ ही तालुक्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातून आलेल्या डॉक्टरांचा तसेच नर्सेस, पॅथॉलॉजिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, रक्तपेढी, टेक्निशियन, वार्डबाॅय, डेड बॉडी मॅनेजर आदींचा राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ते बाेलत हाेते.

याप्रसंगी किरण पांडव, आरमोरी विधानसभा जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हाप्रमुख राजू कावळे, विधानसभा संघटक नंदू कुमरे, उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, जि. प.च्या माजी बांधकाम सभापती छाया कुंभारे, माजी जिल्हाप्रमुख राजगोपाल सुल्लावार, विजय श्रुंगारपवार, तालुकाप्रमुख अमित यासलवार, पप्पी पठाण, अविनाश गेडाम, गजानन नैताम, संजय आकरे, वैभव धात्रक, दिलेश सूरकर, नवनाथ उके, उदय धकाते, चेतन कंदुकवार, अर्थव कापकर, विशाल उरकुडे, अनिकेत झरकर, अरविंद साखरे, नईम शेख, पंकज तटलावार, मनीष मगर तसेच शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: The health system challenged the fight against corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.