आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 11:34 PM2018-07-05T23:34:11+5:302018-07-05T23:35:06+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथील आरोग्य कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर वेतन निकाली काढावे व अन्य प्रलंबित प्रश्न सोडवावे, या मागणीसाठी बुधवारी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने कामबंद आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथील आरोग्य कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर वेतन निकाली काढावे व अन्य प्रलंबित प्रश्न सोडवावे, या मागणीसाठी बुधवारी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने कामबंद आंदोलन करण्यात आले.
महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन निकाली काढावे, या मागणीसाठी वैैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदने देण्यात आली. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मागील मार्च ते मे पर्यंतचे कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले नाही. तसेच सेवा पुस्तक अद्ययावत झाले नाही. कनिष्ठ सहायकाची पदे रिक्त आहेत, आलापल्ली येथील आरोग्य सेविका कुळमेथे यांचे वेतन आॅनलाईन करण्यात आले नाही, तसेच आरसीएच पोर्टलचे जमा करण्यात आलेले अनुदान संबंधित आरोग्य सेविकेच्या खात्यात जमा करण्यात यावे, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत पुरूष व स्त्री शस्त्रक्रिया प्रमोटर व असिस्टंटची रक्कम अदा करण्यात यावी. जानेवारी २०१८ पासून एलआयसी व सोसायटीची रक्कम वेतनातून कपात झाली. परंतु कोणत्याच कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आली नाही. कर्मचाऱ्यांना व्याजापोटी येणारा भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही. तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरू राहिल, असा इशारा आरोग्य कर्मचाºयांच्या वतीने महागावच्या वैैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
कामबंद आंदोलनात एएनएम व्ही. व्ही. घुमे, एस. के. मडावी, जी. एम. तोरे, एच. पी. कुमरे, औषध निर्माण अधिकारी एस. एल. आत्राम एम. आर. नैैताम, परिचर के. एन. तोरे, जी. एम. डोंगरे, डी. पी. म्हशाखेत्री, एमपीडब्ल्यू एस. एम. ढोलणे, एस. मडावी, आरोग्य सेविका एस. डी. हाडगे, एस. एम. सडमेक, एल. आर. कुळमेथे, पठाण, चालुरकर, जुमनाके, कुसराम, पोन्नावार सहभागी झाले.