आराेग्य कर्मचारी ठरू शकतात काेराेना पसरविण्यासाठी जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:36 AM2021-04-06T04:36:00+5:302021-04-06T04:36:00+5:30

काेराेना विषाणूमध्ये संसर्ग पसरविण्याची क्षमता अधिक असल्याने एकमेकांपासून काही अंतर पाळण्याचे आवाहन शासन व आराेग्य यंत्रणेमार्फत केले जात आहे. ...

Health workers may be responsible for the spread of caries | आराेग्य कर्मचारी ठरू शकतात काेराेना पसरविण्यासाठी जबाबदार

आराेग्य कर्मचारी ठरू शकतात काेराेना पसरविण्यासाठी जबाबदार

Next

काेराेना विषाणूमध्ये संसर्ग पसरविण्याची क्षमता अधिक असल्याने एकमेकांपासून काही अंतर पाळण्याचे आवाहन शासन व आराेग्य यंत्रणेमार्फत केले जात आहे. काेराेना रुग्णांची बाधा इतर रुग्णांना हाेण्याची शक्यता असल्याने काेराेना रुग्णांसाठी स्वतंत्र वाॅर्ड ठेवण्यात आला आहे. या वाॅर्डात काम करणारे डाॅक्टर व आराेग्य कमर्चऱ्यांनाही काेराेनाची बाधा हाेण्याची शक्यता असल्याने त्यांना पीपीई किट घालूनच वाॅर्डात प्रवेश करावा लागतो.

यापूर्वीच्या काेराेना लाटेच्या वेळी काेराेना वाॅर्डात काम करणाऱ्या डाॅक्टर व आराेग्य कर्मचाऱ्यांची काही दिवस सलग नेमणूक केली जात हाेती. त्यानंतर त्यांना काही दिवस क्वारंटाइन ठेवले जात हाेते. काेराेनाची भीती असल्याने हे कर्मचारी व डाॅक्टर घरीही जात नव्हते. क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर त्यांना इतर वाॅर्डांमध्ये नेमणूक दिली जात हाेती. या कालावधीत ते घरी जात हाेते. त्यामुळे त्यांचे कुटुंंब काेराेनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहत हाेते.

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र काेराेना वाॅर्डात काम करणारे आराेग्य कर्मचारी व डाॅक्टर काेराेना वाॅर्डातून थेट घरीच जात आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला काेराेनाचा धाेका हाेण्याची शक्यता आहे. त्यांच्या कुटुंबाचा संसर्ग इतर सामान्य नागरिकांना हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना थेट घरी जाण्यावर प्रतिबंध घालण्याची गरज आहे.

काेट

मुला-बाळांची काळजी वाटते; पण काय करणार

काही निवडकच डाॅक्टरांना काेराेना वाॅर्डात काम करावे लागते. रिलिव्हर मिळत नसल्याने काम करणारे डाॅक्टर थकले आहेत. काेराेनाचा संसर्ग आपल्या कुटुंबाला हाेऊ नये ही काळजी आपल्यालाही आहे. मात्र, दुसरीकडे नाेकरी करायची आहे. त्यामुळे माहीत असूनही काेराेना वाॅर्डातून घरी गेल्याशिवाय पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया काही डाॅक्टरांनी दिली आहे.

जीव धाेक्यात घालून काेराेना वाॅर्डात काम करावे लागते. बऱ्याचवेळ पीपीई किट घालून राहावे लागते. उन्हाळा सुरू झाल्याने आता उकाडा वाढला आहे. त्यामुळे पीपीई किट घालून रुग्णालयात काम करणे कठीण हाेते. घामाच्या धारा वाहत राहतात. घरी गेल्याशिवाय आलेला त्राण कमी करणे शक्य नाही. घरी गेल्यानंतर आंघाेळ केली जाते, अशी प्रतिक्रिया काही आराेग्य कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

काेट

घरच्यांची धाकधूक वाढली

रुग्णालयातून थेट घरी गेल्याने आराेग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या मनात काही प्रमाणात धाकधूक कायम राहते. यापूर्वीच्या काेराेना लाटेच्या वेळी पुरेशी काळजी घेऊनही काही आराेग्य कर्मचारी व डाॅक्टर काेराेनाबाधित झाले. त्यांच्या कुटुंबियांनाही काेराेनाचा संसर्ग झाला हाेता. या आठवणी ताज्या हाेताच मनात भीती निर्माण हाेते, अशी प्रतिक्रिया आराेग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुुंबियांनी दिली आहे.

काेट

आराेग्य कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था एएनएम हाेस्टेल व डाॅक्टरांची व्यवस्था जवाहर भवन विश्रामगृहात करण्यात आली आहे. तरीही काही कर्मचारी रुग्णालयातून थेट घरी जात असतील तर ते चुकीचे आहे. प्रत्येकाने याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

डाॅ. अनिल रुडे, जिल्हा शल्यचिकित्सक, गडचिराेली.

Web Title: Health workers may be responsible for the spread of caries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.