सुदृढ आरोग्यासाठी लसीकरण गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 11:20 PM2017-10-09T23:20:58+5:302017-10-09T23:21:12+5:30

मुले हे उद्याचे भविष्य आहेत. त्यांना निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.

Healthy vaccination needs health | सुदृढ आरोग्यासाठी लसीकरण गरजेचे

सुदृढ आरोग्यासाठी लसीकरण गरजेचे

Next
ठळक मुद्देखासदारांचे आवाहन : पोलीस रूग्णालयात इंद्रधनुष्य अभियानाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुले हे उद्याचे भविष्य आहेत. त्यांना निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली अंतर्गत विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचा उद्घाटन समारंभ रविवारी पोलीस रुग्णालय गडचिरोली येथे पार पडला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुढे होते. प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरिष बाला, डॉ. मिलींद रामटेके, डॉ. विलास कुमरे, अधिसेविका कल्पना चांदेकर, शंकर टोगरे आदी उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांनी प्रास्ताविक करताना म्हणाल्या, विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम ही आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या चार महिन्याच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यामध्ये शून्य ते दोन वर्ष वयोगटातील सर्व मुले व गरोदर मातांना पूर्ण लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी काही जोखीमग्रस्त भागात अतिरिक्त लसीकरण सत्र व सर्व अंगणवाडींमध्ये नियमित लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले आहे. ‘सात साल सात बार’ हे या मोहिमेचे घोषवाक्य असून या मोहिमेला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन अर्चना जोशी तर आभार नीलिमा गजभिये यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाºयांनी सहकार्य केले.

Web Title: Healthy vaccination needs health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.