गडचिरोलीच्या पाच तालुक्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:42 PM2018-08-13T12:42:49+5:302018-08-13T12:44:36+5:30

गडचिरोली जिल्ह्यात शनिवारच्या रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत दमदार पाऊस बरसला.

Heavy rain in five talukas of Gadchiroli | गडचिरोलीच्या पाच तालुक्यात अतिवृष्टी

गडचिरोलीच्या पाच तालुक्यात अतिवृष्टी

Next
ठळक मुद्देजनजीवन प्रभावित नद्यांना पूर आल्याने अनेक मार्ग बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात शनिवारच्या रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत दमदार पाऊस बरसला. पावसामुळे आलापल्ली-भामरागड व बामणी टेकडा ताला मार्ग बंद झाल्याने शेकडो गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ७७.६ मिमी पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली आहे.
धानोरा, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड या पाच तालक्यात अतिवृष्टी झाली. भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीला पूर आल्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. भामरागड शहरातील काही घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. 
गडचिरोली, धानोरा, आरमोरी, देसाईगंज, कोरची तालुक्यासह जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात दमदार पाऊस बरसला.

पावसामुळे धान उत्पादकांना दिलासा
चंद्रपूर- भंडारा जिल्ह्यांमध्ये शनिवारपासून पावसाने हजेरी लावल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, मात्र धान रोवणीची रखडलेली कामे पूर्ण होण्यासाठी अद्यापही दमदार पावसाची प्रवासाची प्रतीक्षा आहे. मागील दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे धान रोवणी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली होती. रोवणीनंतर पुरेसा पाऊसच न आल्याने जमिनीला भेगा पडल्या होत्या. दरम्यान, शनिवारपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे पुनरागमन झाल्याने धान उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. रविवारी दिवसभर चंद्रपूर शहरासह सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची रिपरिप सुरू होती. परिणामी खरीप हंगामातील खोळबंलेली शेतीची कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बोंड अळीचा प्रादुर्भाव
सुरूवातीला पावसाने साथ दिल्याने ही पिके जोमाने वाढत असल्याचे दिसून यत आहे. जिल्ह्यातील १० गावांमध्ये कपासीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरू झाला. यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. तर दुसरीकडे धान उत्पादक तालुक्यामध्ये रोवणीनंतर दमदार पाऊसच न आल्याने पीक करपण्याची स्थिती निर्माण झाली होती.

Web Title: Heavy rain in five talukas of Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस