कोरची तालुक्याला वादळी पाऊस, गारपिटीचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 11:12 PM2021-05-19T23:12:48+5:302021-05-19T23:21:34+5:30
सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. जोराच्या वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या वादळात नागरिकांच्या घरांवरील सिमेंट छत व कवेलू उडाले. सिमेंटची शिटही उलटून रस्त्यावर पडल्या. पाऊस आणि गारा घरात जमल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोरची : जिल्ह्याच्या उत्तर टोकावर असलेल्या कोरची तालुक्याला बुधवारच्या संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने झोडपून काढले. यावेळी अनेक भागात गारपिटही झाली. नागरिकांच्या घरांचे छत उडाले तर कुठे झाड कोसळून नुकसान झाले. यात जीवितहानी झाली झाल्याचे वृत्त नाही.
सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. जोराच्या वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या वादळात नागरिकांच्या घरांवरील सिमेंट छत व कवेलू उडाले. सिमेंटची शिटही उलटून रस्त्यावर पडल्या. पाऊस आणि गारा घरात जमल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले.
कोरची शहरातील अनेक विद्युत खांब तुटून रस्त्यावर पडले. झाडे उन्मळून पडली. विशेष म्हणजे बीएसएनएलचा एक टॉवरही कोसळला. तसेच कार्यालयाची संरक्षक भिंत पडली. बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधील सिमेंटचे छत उडाले. अनेक विद्युत तारा रस्त्यावर पडून सर्व्हिस वायर तुटल्या आहेत.
सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल झाल्याने ग्रामीण भागातील वीज पुरवठा काही वेळासाठी खंडित झाला हाेता. गडचिराेली शहरातही अधूनमधून वीजेचा लपंडाव सुरू हाेता.
अवघ्या ३० मिनिटांत बदलले चित्र
अचानक वातावरणात झालेला बदल आणि त्यानंतर वादळी पाऊस व गारपिट होण्याचा हा घटनाक्रम अवघ्या ३० मिनिटात आटोपला. पण या अल्पशा वेळेत कोरचीतील चित्र खूप बदलले होते. मागील चार-पाच दिवसांपासून वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून व्यक्त केली जात आहे. त्यातून सतर्क राहण्याचा इशाराही नागरिकांना दिला होता. गेल्या चार दिवसात नुकसानकारक काही झाले नसले तरी बुधवारी संध्याकाळचा थरार कोरचीवासीयांसाठी मोठा नुकसानकारक ठरला.