गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; शेकडो गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:45 PM2019-08-23T12:45:53+5:302019-08-23T12:46:16+5:30
बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडविली आहे. अहेरी तालुक्यातील कमलापूर परिसरातील सर्व नाल्यांना पूर आल्याने येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांची दैना
श्रीधर दुग्गीरालापाटी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडविली आहे. अहेरी तालुक्यातील कमलापूर परिसरातील सर्व नाल्यांना पूर आल्याने येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कमलापूर रेपनपल्ली नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असून हा मार्ग कालपासून बंद आहे. परिणामी शेकडो लहान गावे, वस्त्या या संपर्कापासून तुटल्या आहेत. कालपासून सुरू झालेला पाऊस सध्याही हे वृत्त लिहिस्तोवर जोरात सुरू होता. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रोवणी केलेली रोपे वाहून गेली आहेत तर काही शेतात पाणी साठून ती सडण्याच्या मार्गावर आहेत.