सिराेंचा व भामरागड तालुक्यात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:21 AM2021-07-24T04:21:59+5:302021-07-24T04:21:59+5:30
गडचिराेली : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी रात्री सिराेंचा व भामरागड तालुक्याला पावसाने झाेडपून काढले. ...
गडचिराेली : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी रात्री सिराेंचा व भामरागड तालुक्याला पावसाने झाेडपून काढले. त्यामुळे या तालुक्यांमधील काही ठिकाणचे मार्ग बंद पडले.
गडचिराेली-चामाेर्शी मार्गावरील गाेविंदपूर नाल्याच्या रपट्यावरून शुक्रवारी सकाळपासूनच पाणी असल्याने या मार्गावरची वाहतूक सायंकाळपर्यंत बंद हाेती. सायंकाळी पाणी कमी झाल्यानंतर लहान वाहनांना जाण्यास परवानगी देण्यात आली हाेती. गडचिराेली-चामाेर्शी मार्गावरील वाहने माराेडा, पाेटेगाव, कुनघाडामार्गे वळविण्यात आली हाेती. सध्या राज्यभरात पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीकाठाजवळच्या तसेच सखल भागात असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सिराेंचा तालुक्यात पाऊस सुरू झाल्याने राेवणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र अनेक लहान पूल पाण्यात बुडले असल्याने काही गावांचा संपर्क तुटला हाेता.
बाॅक्स..
गाेदावरी व वैनगंगा फुगली
- पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाल्याने गाेदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे या धरणाचे ८५ पैकी ७५ गेट उचलण्यात आले आहेत. गाेदावरी नदीच्या काठावर सिराेंचा तालुक्यातील काेतापल्ली, नदीकुंठा, चिंतरवेला, अंकिसा, आसरअल्ली, सुंकरअली, मुकटीगट्टा, बाेमेलकाेंडा, साेमनूर ही गावे आहेत. या गावांना पुराचा धाेका हाेऊ शकताे. त्यामुळे गावामध्ये दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने तहसीलदारांना केले आहे.
- या बॅरेजमधून ३३ हजार ९८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वैनगंगा नदीवर असलेल्या गाेसेखुर्द धरणाचे १९ दरवाजे पाच मीटरने उघडण्यात आले आहेत. या धरणातून ३ हजार ३८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.