अवजड वाहनांमुळे डांबरी रस्त्याची लागली ‘वाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:38 AM2021-07-30T04:38:23+5:302021-07-30T04:38:23+5:30

पावीमुरांडाकडे जाणारा रस्ता डांबरी आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येताे. परंतु याच रस्त्याने रस्ता बांधकाम करणाऱ्या साहित्याची ने-आण ...

Heavy vehicles cause 'wait' on asphalt roads | अवजड वाहनांमुळे डांबरी रस्त्याची लागली ‘वाट’

अवजड वाहनांमुळे डांबरी रस्त्याची लागली ‘वाट’

Next

पावीमुरांडाकडे जाणारा रस्ता डांबरी आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येताे. परंतु याच रस्त्याने रस्ता बांधकाम करणाऱ्या साहित्याची ने-आण करणाऱ्या कंपनीची वाहने भाडभिडी मोकासाकडून येतात. ह्या वाहनांमध्ये मुरुम व अन्य साहित्य भरलेले असते. सततच्या रहदारीमुळे येथील रस्ता पूर्णत: फुटला आहे. मुरूम नेणाऱ्या वाहनांद्वारे खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्यात आला आहे; परंतु मुरुरमामुळे चिखल निर्माण झाला आहे. सध्या येथून पायी चालणे तर साेडाच परंतु बैलबंडीने ने-आण करणे कठीण झाले आहे. त्यातून बैलबंडी व पायी चालणे कठीण झाले आहे. भाडभिडी समोरून ज्या ठिकाणून मुरुम खोदकाम सुरू आहे. त्या ठिकाणाहून १ किमीचा रस्ता जड वाहतुकीचा नसून केवळ शेतीकडे जाण्यासाठीच असूनही यावरून अवजड मुरुमाच्या ट्रकने मुरमाची वाहतूक सुरू आहे. परिणामी रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

बाॅक्स

मुरुम खाेदकामाची चाैकशी करा

भाडभिडी परिसरात ज्या ठिकाणी मुरुमाचे खाेदकाम सुरू आहे. सदर खाेदकाम शासनाच्या नियमानुसार नाही. महसूल विभागाकडून कधीच संबंधित खोदकामाच्या ठिकाणाची पाहणी करण्यात आली नाही. यामुळे सदर विभागातील काहींसोबत आर्थिक व्यवहार तर झाले नाही ना, अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. मुरुम वाहतूक परवान्याची तसेच मुरुम खाेदकामाची चाैकशी करून कारवाई करावी, अशी मागणी भाडभिडी व पावीमुरांडा परिसरातील नागरिकांनी केली आहे.

290721\img_20210729_150905.jpg

तळोधीचा चिखलमय बायपास रास्ता त्यावरून चालणेही मुश्किल झाले आहे.

Web Title: Heavy vehicles cause 'wait' on asphalt roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.