हेक्टरी ३० हजारांची मदत द्या
By admin | Published: September 16, 2015 01:51 AM2015-09-16T01:51:27+5:302015-09-16T01:51:27+5:30
तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ३० हजार रूपये मदत देण्यात यावी, अशी मागणी ...
मुख्यमंत्र्यांना निवेदन : आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा
आरमोरी : तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ३० हजार रूपये मदत देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या वतीने तहसीलदारांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, कृषिपंपाची वीज नियमित सुरू ठेवण्यात यावी, कृषीपंपाची वीज बिल माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांचे पीक कर्ज पूर्णपणे माफ करण्यात यावे, इटियाहोह प्रकल्पाचा डावा कालवा तयार करून त्याचे पाणी शेतकऱ्यांना देण्यात यावे, घरगुती वीज पुरवठा नियमित करावा, विहीरगाव, नरोटीचक येथील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. सदर निवेदन देते वेळी, भाजपाचे तालुकाध्यक्ष भारत बावनथडे, सदानंद कुथे, पंकज खरवडे, सुनील नंदनवार, नंदू नाकतोडे, प्रफुल निंबेकार, रोहित धकाते, राजेंद्र म्हशाखेत्री, कमलाकर वाढणकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)