मृताच्या कुटुंबाला मदत द्या!

By Admin | Published: February 16, 2017 02:02 AM2017-02-16T02:02:47+5:302017-02-16T02:02:47+5:30

आरमोरी नगर पंचायतीमधील कर्मचारी भाऊराव तोरणकर यांचे शनिवारी रात्री अपघाती निधन झाल्याने शहरात चांगलेच पडसाद उमटले.

Help the deceased's family! | मृताच्या कुटुंबाला मदत द्या!

मृताच्या कुटुंबाला मदत द्या!

googlenewsNext

नागरिकांची मागणी : भाऊराव तोरणकर यांचे अपघाती निधन
आरमोरी : आरमोरी नगर पंचायतीमधील कर्मचारी भाऊराव तोरणकर यांचे शनिवारी रात्री अपघाती निधन झाल्याने शहरात चांगलेच पडसाद उमटले. तोरणकर यांच्या निधनामुळे कुटुंबाचा आर्थिक आधार नाहीसा झाल्याने त्यांच्या कुटुंबाला १० लाखाची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी तहसीलदारांकडे केली.
घटनेची माहिती मिळताच शहरातील नागरिकांनी उपजिल्हा रूग्णालयात एकच गर्दी केली होती. तोरणकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर जोपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार येत नाही. तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्राही नागरिकांनी घेतला होता. आर्थिक मदतीसह अनुकंपातत्त्वावर मृतकाच्या वारसानास नोकरी द्यावी, अशी मागणी नागरिकांनी घटनेच्या दिवशी रेटून धरली. त्यानंतर एसडीओ दामोधर नान्हे, तहसीलदार मनोहर वलथरे यांनी रूग्णालयात नातेवाईकांशी भेट घेतली व १० लाख रूपये आर्थिक मदतीसंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवू, असे सांगितले. तोरणकर यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी नागरिकांनी केली. (वार्ताहर)

Web Title: Help the deceased's family!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.